अहिल्यादेवी पुरस्काराचे वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अहिल्यादेवी पुरस्काराचे वितरण
अहिल्यादेवी पुरस्काराचे वितरण

अहिल्यादेवी पुरस्काराचे वितरण

sakal_logo
By

03541
कबनूर ः कबनूर ग्रामपंचायतीतर्फे अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार वर्षा कोरे यांना शोभा पोवार, अर्चना पाटील यांनी प्रदान केला.
-------------
अहिल्यादेवी पुरस्काराचे वितरण
कबनूर ः पुरस्काराने सेवाभावी वृत्तीने विधायक सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला काम करण्यास आणखीन ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन सरपंच शोभा पोवार यांनी केले. कबनूर ग्रामपंचायतीतर्फे अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. वर्षा कोरे, भक्ती शिंदे, सुवर्णा शेटे, सुस्मिता नोरजे, सपुरा सेठजी, सुजाता कदम यांना अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार दिला. वर्षा कोरे, सुवर्णा शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठनेते बी. डी. पाटील, उपसरपंच सुनील काडाप्पा, ग्रामविकास अधिकारी जी. डी. आदलिंग, ग्रामपंचायत सदस्या अर्चना पाटील, प्रवीण जाधव आदी उपस्थित होते. माजी सरपंच सुधीर पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.