कबनूरमधील जलजीवन योजनेच्या बैठकीत खडाजंगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कबनूरमधील जलजीवन योजनेच्या बैठकीत खडाजंगी
कबनूरमधील जलजीवन योजनेच्या बैठकीत खडाजंगी

कबनूरमधील जलजीवन योजनेच्या बैठकीत खडाजंगी

sakal_logo
By

कबनूर ‘जलजीवन’च्या बैठकीत खडाजंगी

कबनूर, ता. ४ ः येथील जलजीवन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेत वाढीव पाईपलाईनसंदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत खडाजंगी झाली. जलजीवन समितीच्या अध्यक्षा, सचिव आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता यांच्यावर समितीच्या सदस्यांनी प्रश्नांचा भडिमार केल्याने त्यांना समर्पक उत्तरे देता आली नाहीत.
जिल्हा परिषद माजी सदस्य जयकुमार कोले, बी. डी. पाटील, अशोकराव पाटील, जयकुमार काडाप्पा आदी जलजीवन योजना समितीच्या सदस्यांनी जलजीवन समितीच्या अध्यक्षा सरपंच शोभा पोवार, सचिव ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग व जीवन प्राधिकरण अभियंता आर. व्ही. परीट यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत धारेवर धरले.
अशोक पाटील म्हणाले, ‘लक्ष कमिटीने विचारलेले सोळा प्रश्नांची उत्तरे आणि माझ्या ३२ प्रश्नांची उत्तरे द्या.’ जयकुमार काडाप्पा म्हणाले, ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी जलजीवन समिती सदस्यांना पूर्ण व खरी माहिती देत नसतील तर अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात असा ठराव या बैठकीत करावा.’
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अभियंता आर. व्ही. परीट प्रोजेक्टवर पाणीपुरवठा पाईपलाईन संदर्भात माहिती देत होते. परंतु पाईपलाईन संदर्भात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांना समर्पक अशी उत्तरे देता आली नाहीत. अभियंता श्री.परीट यांना पाईपलाईनसंदर्भात पूर्णतः माहिती नसेल तर त्यांनी प्रोजेक्टवरून माहिती सांगणे बंद करावे व पुढील मिटींगला पूर्णतः माहिती देणाऱ्या व्यक्तीला बोलवावे, असे मत सदस्यांनी मांडल्यानंतर प्रोजेक्टवरील माहिती बंद केली. जलजीवन योजनेसंदर्भात पुढील बोलावण्यात येणाऱ्या बैठकीवेळी आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार यांना बोलावून जलजीवन योजनेबाबत सविस्तर चर्चा करावी, असे ठरले. उपसरपंच सुनील काडाप्पा, पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील, बबन केटकाळे, ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील, सुधीर लिगाडे आदी उपस्थित होते.