संस्कृती संवर्धनासाठी संस्काराची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संस्कृती संवर्धनासाठी संस्काराची गरज
संस्कृती संवर्धनासाठी संस्काराची गरज

संस्कृती संवर्धनासाठी संस्काराची गरज

sakal_logo
By

03555
कबनूर ः येथील ध्वजस्तंभ लोकार्पण कार्यक्रमात धनंजय देसाई यांनी मार्गदर्शन केले.
--------
संस्कृती संवर्धनासाठी संस्काराची गरज
धनंजय देसाई; कबनूरमध्ये भगवा ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळा
कबनूर, ता. ६ ः आजच्या काळात संस्कार महत्वपूर्ण असून संस्कृती संवर्धनासाठी संस्काराची फार गरज आहे, असे प्रतिपादन हिंदूराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांनी केले.
येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून भगवा ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई होते.
प्रारंभी भगवा ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळा श्री. देसाई, श्री. रावसाहेब देसाई, पुंडलिकराव जाधव, श्री मारुती मंदिर ट्रस्ट अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुनील काडाप्पा, बजरंग दल जिल्हा संयोजक दत्तात्रय पाटील, माजी सरपंच सुधीर पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुधीर लिगाडे, प्रवीण जाधव, अर्चना पाटील, रजनी गुरव, बबन केटकाळे उपस्थित होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कबनूरचे कार्याध्यक्ष अनिल साळुंखे यांनी स्वागत केले. शाखाध्यक्ष गणेश सुतार यांनी प्रास्ताविक केले. संगीता चव्हाण,वर्षा कोरे यांनी सूत्रसंचालन केले.