Wed, October 4, 2023

कबनूरमध्ये शिवराज्याभिषेक दिन
कबनूरमध्ये शिवराज्याभिषेक दिन
Published on : 6 June 2023, 1:16 am
कबनूरमध्ये शिवराज्याभिषेक दिन
कबनूर ः ग्रामपंचायतीतर्फे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामपंचायत प्रांगणात गुढी उभारली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच शोभा पोवार यांनी केले. गुढीचे पूजन देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील, बाबासाहेब कोकणी यांच्याहस्ते झाले. माजी सरपंच मधुकर मणेरे, सुधीर पाटील, ग्रामपंचायत सदस्या रजनी गुरव, ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग आदी उपस्थित होते.