पाझर तलावाचे अस्तित्व कायम ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाझर तलावाचे अस्तित्व कायम ठेवा
पाझर तलावाचे अस्तित्व कायम ठेवा

पाझर तलावाचे अस्तित्व कायम ठेवा

sakal_logo
By

00983
कसबा सांगाव ः येथे पाझर तलावाबाबत झालेल्या बैठकीत बोलताना तहसीलदार शिल्पा ठोकडे. शेजारी संकेत गोसावी, एम. एस. कलकुटगी, अजितकुमार जाधव, सरपंच रणजित कांबळे आदी.

पाझर तलावाचे अस्तित्व कायम ठेवा
कसबा सांगाव ग्रामस्थांची मागणी ः बंधारा सुरक्षित ठेवण्याचे एमआयडीसीकडून आश्वासन

कसबा सांगाव, ता. २० ः येथील ‘एमआयडीसी’ परिसरातील कसबा सांगावच्या पाझर तलावाचे अस्तित्व कायम ठेवावे, अशी मागणी करत औद्योगिक विकास महामंडळाच्या बंधाऱ्याच्या प्रस्तावित पाईप टाकण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शवला. कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील हनुमान मंदिरात बैठक झाली. पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, कार्यकारी अभियंता एम. एस. कलकुटगी उपस्थित होते.
१९७२ ला दुष्काळात ग्रामस्थांच्या श्रमदानातून हा बंधारा बांधला. शेकडो लोकांनी तुटपुंज्या मानधनावर बंधाऱ्यासाठी परिश्रम घेतले. बंधाऱ्याचे ९ हेक्टर पाणलोट क्षेत्र आहे. जवळपास ८० विहिरींना या तलावाचा पाझर मिळतो. तलावामुळे परिसरातील ३०० एकर शेतीला पाणी मिळते. असे असतानाही शासनाच्या प्रतिनिधींनी बंधाऱ्याचे नुकसान करणे निषेधार्ह आहे. बाराशे एकर जमीन गावाने दिली, बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे, तलावाची जागा सुरक्षित ठेवावी, अशी मागणी करत प्रसंगी कायदेशीर लढाई लढू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
महामंडळाची बाजू मांडताना कार्यकारी अभियंता कलकुटगी यांनी केवळ ८० मीटर बंधारा सुरक्षित ठेवू असे सांगितले. बंधाऱ्याला कोणताही धोका होणार नाही, असे सांगितले.
संजय हेगडे, राजेंद्र माने, एस. आर. पाटील, अविनाश मगदूम, मनोज कोडोले, राजू शेटे, सरपंच रणजित कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस उपअभियंता एस. व्ही. अपराज, सरपंच रणजित कांबळे, पोलिस निरीक्षक अजितकुमार जाधव, दीपक वाकचौरे, पोलिसपाटील छाया हेगडे, विक्रमसिंह जाधव, अजित शेटे, विनायक आवळे, बापूसाहेब शेटे, विक्रमसिंह माने आदी उपस्थित होते.

कोट
ग्रामस्थांची भूमिका समजून घेतली आहे. ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांची भूमिका ऐकून सविस्तर चर्चा करू, बैठकीची पुढील तारीख कळवू.
- शिल्पा ठोकडे, तहसीलदार कागल

Web Title: Todays Latest Marathi News Kbs22b00704 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top