कसबा सांगाव: उद्योजकांचे उपोषण मागे, समरजितसिंह घाटगे यांची मध्यस्थी, उद्योग मंत्र्यासोबत बैठकीचे आश्वासन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसबा सांगाव: उद्योजकांचे उपोषण मागे, समरजितसिंह घाटगे यांची मध्यस्थी, उद्योग मंत्र्यासोबत बैठकीचे आश्वासन
कसबा सांगाव: उद्योजकांचे उपोषण मागे, समरजितसिंह घाटगे यांची मध्यस्थी, उद्योग मंत्र्यासोबत बैठकीचे आश्वासन

कसबा सांगाव: उद्योजकांचे उपोषण मागे, समरजितसिंह घाटगे यांची मध्यस्थी, उद्योग मंत्र्यासोबत बैठकीचे आश्वासन

sakal_logo
By

01098
कसबा सांगाव : उपोषणास्थळी उद्योजकांशी चर्चा करताना समरजितसिंह घाटगे.

लघुउद्योजकांचे उपोषण मागे
समरजितसिंह घाटगे यांची मध्यस्थी; उद्योगमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन

कसबा सांगाव, ता. ९ : कागल, गोकुळ शिरगाव व शिरोली औद्योगिक वसाहतीमधील लघुउद्योजकांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण दुसऱ्या दिवशी मागे घेतले. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या मध्यस्थीनंतर उपोषणाची सांगता झाली.
कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील फ्रॉस्टी चौक परिसरात इमको असोसिएशन, कोल्हापूरतर्फे एमआयडीसी कार्यालय भ्रष्टाचारमुक्त करणे, गरजू सभासदांना शासकीय दराने भूखंड मिळावा, औद्योगिक वसाहतीत असोसिएशनच्या कार्यालयाला भूखंड मिळावा, सभासदांसाठी क्लस्टर योजना सुरू करावी, तक्रारी निवारणासाठी वरिष्ठांसोबत बैठक घ्यावी आदी मागण्यांसाठी उद्योजकांनी आंदोलनास सुरुवात केली होती. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा अध्यक्ष राजीव आवटे यांनी दिला होता. दरम्यान आंदोलनाची दखल घेत समरजितसिंह घाटगे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. अध्यक्ष आवटे आणि उद्योजकांशी चर्चा करून उद्योगमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. यानंतर उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपोषण मागे घेतले. घाटगे यांच्या हस्ते लिंबूपाणी घेत सांगता झाली. दरम्यान इमको सदस्य अमित पाटील, विजय दाभाडे, सतीश पाटील, निवास माने, राहुल पाटील, मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, मोहन कुशिरे, गोशिमाचे सचिन शिरगावकर यांनी प्रादेशिक आधिकरी श्री. भिंगारे यांच्याशी कोल्हापूरच्या कार्यालयात चर्चा केली. यावेळी नयन गारगोटे, अमित पाटील, विजय शिंदे, विकास पाटील, संदीप वाठारे, प्रशांत पाटील, संदीप कदम, नवनाथ पाटील उपस्थित होते.