कसबा सांगाव: सराईत चोरट्यास अटक

कसबा सांगाव: सराईत चोरट्यास अटक

फोटो सिंगल
1182
...
कागलमध्ये चोरटा जेरबंद

कसबा सांगाव, ता.२१ः येथील महावीर नगर, चौगुले मळा परिसरात बंद घराच्या बेडरूममधील तिजोरीतून पावणे दोन तोळ्यांचे सोन्याचे घंटण अज्ञाताने लांबविल्याची घटना १४ मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली होती. याबाबत पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी तपास सुरू केला होता. कर्नाटक राज्यातील सराईत चोरटा सुमित महादेव निकम (वय २६, रा. गजबरवाडी, ता.निपाणी) हा कागल शहरात चोरीचा माल विकण्यासाठी येत असल्याची माहिती कागल पोलिसांना मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात सापळा लावून पोलिसांनी चोरट्यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे घंटण मिळून आले. ६० हजार रुपये किंमतीचे दागिने आणि दुचाकी असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. बीट अंमलदार प्रशांत माने, रणजित शिंगारे, औताडे, सावंत, तांबेकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com