कसबा सांगाव: माझ्या कामाचे नारळ दुसऱ्यांनी फोडावे हे दुर्दैव...आमदार हसन मुश्रीफ कसबा सांगाव येथे सव्वा अकरा कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन व लोकार्पण

कसबा सांगाव: माझ्या कामाचे नारळ दुसऱ्यांनी फोडावे हे दुर्दैव...आमदार हसन मुश्रीफ कसबा सांगाव येथे सव्वा अकरा कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन व लोकार्पण

01223

कसबा सांगावः येथे आमदार हसन मुश्रीफ, युवराज पाटील यांचा सत्कार करताना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ.
...

आम्ही केलेल्या कामांचे नारळ
दुसऱ्यांनी फोडावे हे दुर्दैव

हसन मुश्रीफः कसबा सांगाव येथे विकाकामांचे उदघाटन व लोकार्पण
कसबा सांगाव, ता.२२ः ‘तालुक्यातील सर्वात मोठ्या कसबा सांगावमध्ये ४२ कोटी रुपयांची कामे मी केली आहेत. तालुक्यातील सर्व जल जीवन अंतर्गत पाणी योजनेचा आराखडा करून निधीची तरतूद केली. आम्ही केलेल्या कामांचे नारळ दुसऱ्यांनी फोडावे हे दुर्दैव आहे,’ असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
कसबा सांगाव येथे सव्वा अकरा कोटी रुपयांच्या कामांचे उदघाटन व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार मुश्रीफ, युवराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
मुश्रीफ म्हणाले, ‘तालुक्यातील जनतेने दिलेल्या संधीचे सातत्याने मी सोने केले आहे. मंत्रीपदाच्या काळात तालुक्यातील प्रत्येक गावाला मोठा निधी देवून कायापालट केला आहे. बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. राज्यातील सत्तांतरानंतर स्थगिती दिलेली उर्वरित सव्वा अकरा कोटी रुपयांनी कामे आता मार्गी लागली आहेत. येणाऱ्या निवडणुका मोठ्या ताकदीने लढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे.’
युवराज पाटील म्हणाले, ‘विरोधकांनी टीका करण्यापलीकडे काहीही केले नाही. आमदार मुश्रीफ यांनी विकासगंगा आणली. विरोधकांनी निधी आणून दाखवावा.’ माजी सरपंच रणजीत कांबळे, भैय्या माने, राजेंद्र माने, उमेश माळी यांनी मनोगत व्यक्त केले. माजी सभापती राजश्री माने, माजी सरपंच वंदना माने, कृष्णात पाटील, विकास पाटील, अजित शेटे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत अमोल माळी यांनी केले. प्रास्ताविक किरण पास्ते यांनी केले. आभार अमर कांबळे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com