कडगाव : तरुण बुडाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कडगाव : तरुण बुडाला
कडगाव : तरुण बुडाला

कडगाव : तरुण बुडाला

sakal_logo
By

००८८३

पाटगाव प्रकल्पात
शिसेवाडीचा तरुण बुडाला
दोन दिवसांपासून शोध मोहीम सुरू
कडगाव, ता. ४ : पाटगाव (ता. भुदरगड) प्रकल्पाच्या बॅक वॉटरमध्ये कडगाव पैकी शिसेवाडी येथील तरुण बुडाला. अभिजित मधुकर सरंबळकर (वय १८) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. काल दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. अद्याप त्याचा शोध चालू आहे.
घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, पाटगाव प्रकल्पातील बॅक वॉटरमध्ये पास रेस्क्यू फोर्सच्या वतीने जवानांना महापुराच्या वेळी बोटीच्या सहाय्याने मदत कार्य करण्याचे प्रशिक्षण सुरू होते. प्रशिक्षण सोमवार (ता. २) पासून चालू होते. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास प्रशिक्षणा दरम्यान अभिजित बुडाला. गेले दोन दिवस आपत्कालीन टीमच्या वतीने बोटीच्या साहाय्याने त्याचा शोध सुरू आहे. धरणाच्या पाण्यात लाकडांचे ओंडके, पूर्वी मासे पकडण्यासाठी टाकलेली जाळी, झाडांचे खुंट, गाळ अडचणींमुळे शोध मोहीम थांबवली. अभिजीत गारगोटी येथील एका महाविद्यालयात कला शाखेत शिकत होता. त्याच्या मागे आई वडील भाऊ, दोन बहिणी आहेत. भुदरगडचे पोलिस निरीक्षक संजय मोरे, अमित देशमुख, सतीश पाटील, युवराज पाटील आदी अधिकारी कर्मचारी घटनास्थळी लक्ष देऊन होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kdg22b00801 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top