शिवडाव सोनवडे – घोटगे घाट रस्त्यासाठी शंखध्वनी. /महत्त्वाचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवडाव सोनवडे – घोटगे घाट रस्त्यासाठी शंखध्वनी. /महत्त्वाचे
शिवडाव सोनवडे – घोटगे घाट रस्त्यासाठी शंखध्वनी. /महत्त्वाचे

शिवडाव सोनवडे – घोटगे घाट रस्त्यासाठी शंखध्वनी. /महत्त्वाचे

sakal_logo
By

शिवडाव सोनवडे
घोटगे घाट रस्त्यासाठी
शंखध्वनीचा इशारा
  
कडगाव, ता. ९: शिवडाव सोनवडे–घोटगे घाट कृती समितीच्या वतीने वन हद्दीतील कामास तातडीने सुरुवात व्हावी या मागणीसाठी  उपअभियंता उपविभाग गारगोटी कार्यालयासमोर बुधवारी(ता.११) शंखध्वनी आंदोलन करणार आहोत, असा इशारा अध्यक्ष बाबासाहेब देसाई यांनी निवेदनाद्वारे दिला. गेली पंचवीस वर्ष दोन जिल्ह्याना जोडणारा राज्यमार्ग व्हावा यासाठी जनआंदोलन सुरूआहे. सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्यातील लोकांना जवळचा मार्ग म्हणून शिवडाव सोनवडे–घोटगे घाट रस्ता आहे.या रस्त्याची मागणी स्वातंत्र्योत्तर काळापासून आहे. या रस्ते प्रकल्पास राज्य शासनाने १९९८ ला मान्यता दिली. परंतु, प्रकल्पाचे काम प्रशासनाच्या लालफितीत अडकले.
वन हद्द वगळता कुडाळ-पणदूर-सोनवडे घोटगे नाईकवाडी गारगोटी दरम्यान रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. वन हद्दीतील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोड मॅप सर्वे, भारतीय रोड काँग्रेस मानकाप्रमाणे करावा असा आदेश रस्ते सचिवांनी दिला. सिंधुदुर्ग वन हद्दीतील रस्त्याचा सर्वे चुकीचा करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. समितीचे उपाध्यक्ष शंकर गुरव, कार्याध्यक्ष लहू कुडतरकर, दिनकर चांदम, एन के कांबळे, सत्यजित वेतूर्लेकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kdg22b00809 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top