
टुडे ३ ॲंकर
-महाराष्ट्र दिन विशेष
शेकरू
महाराष्ट्राची मानचिन्हे धोक्यात
शेकरू, हरियालाचे दर्शन झाले दुर्मिळ; पर्यावरणप्रेमींकडून संवर्धनाची मागणी
कुंडलिक पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. ३० ः वाढते शहरीकरण, जंगलतोड यामुळे महाराष्ट्राचे मानचिन्ह शेकरू, हरियाल हे पशुपक्षी धोक्यात आले आहेत.
महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू, फुलपाखरातील निळी भिरभिरी तर आंब्याचे गावठी वाण टिकवण्याचे आवाहन बनले आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पर्यावरणप्रेमींकडून या मानचिन्ह यांच्या संवर्धनाची मागणी होत आहे.
देशात महाराष्ट्राची ओळख ज्यामुळे आहे, अशी मानचिन्ह धोक्याच्या वळणावर आहेत. सह्याद्रीच्या रांगात गावांचे विस्तारीकरण झाले. यामुळे अमाप वृक्षतोड झाली आहे. कोल्हापूर, मुंबई महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाच्या दरम्यान वड, पिंपळ, वृक्ष मोठ्या प्रमाणात तोडले गेले, त्या झाडावर असणाऱ्या हरियाल पक्षी धोक्यात आला आहे. पश्चिम घाट कोल्हापूर कात्यायनी, सांगरुळ डोंगर परिसरात सध्या हरियाल क्वचित दिसतो.
जंगलातील मोठी खार म्हणजे शेखरू, जंगलातील उंच-उंच झाडे आणि आवश्यक खाद्य नष्ट होत चालल्याने तसेच वाढत्या मानवी वावरामुळे शेकरू दर्शन दुर्मिळ झाले आहे. पाटगाव, पन्हाळा, चंदगड, आजरा, भुदरगड आंबा या जंगल क्षेत्रात सध्या दुर्मिळ वावरताना नजरेत पडतो.
आंबा, हिरडा, बेरडा ही झाडे खाद्य म्हणून ठिकाण आहे. शेकरू समृद्ध जंगलाचा निर्देशांक मानला जातो, काही वर्षांपूर्वी पर्यावरण मंत्रालयाने शेकरू संवर्धन पंधरवडा साजरा केला मात्र या वर्षी पुन्हा शासनाला शेकरूचा विसर पडला आहे. महाराष्ट्रात आंबा हे महत्त्वाचे फळ आहे; राज्यात आंब्याच्या १६०० हून अधिक जाती आहेत. गावठी आंब्याची झाडे पूर्वी शेतीच्या बांधावर दिसत होती,आत ती दुर्मिळ झाली आहेत.
कोट
वनस्पतींचे वृक्षारोपण करावे, सर्वत्र हापूस हापूस मागणी असते, मात्र निसर्गात टिकणारे ज्यात्या परिस्थितीनुसार टिकणारी जुने आंब्याचे वाण दुर्मिळ होत आहेत. जंगल तोड झाल्याने आणि डोंगर पेटवल्यामुळे पशुपक्षी मरण पावत आहेत. महाराष्ट्राचे मानचिन्ह वाचवणे आता आवाहन बनले आहे.
-अनिल चौगले, निसर्ग मित्र संस्था, वन्य
कोट
राधानगरी, दाजीपूर, गोलिवडे, हसणे, पाटपन्हाळा या ठिकाणी शेकरूचे प्रमाण वाढत आहे. स्थानिक गावातून शेकरू मित्र नेमून, तीन दिवसांचा सेशन्स कार्यक्रम घेतला असून शेकरूची गणना, मूल्यमापन सुरू आहे. यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
-विशाल माळी, विभागीय वन अधिकारी वन्यजीव
Web Title: Todays Latest Marathi News Kdt22b01879 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..