कुंभी वर मोर्चा,व सत्ताधारी गटाची पत्रकार बैठक दोन्ही बातम्या समान घ्याव्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभी वर मोर्चा,व सत्ताधारी गटाची पत्रकार बैठक दोन्ही बातम्या समान घ्याव्या
कुंभी वर मोर्चा,व सत्ताधारी गटाची पत्रकार बैठक दोन्ही बातम्या समान घ्याव्या

कुंभी वर मोर्चा,व सत्ताधारी गटाची पत्रकार बैठक दोन्ही बातम्या समान घ्याव्या

sakal_logo
By

नियोजनबद्ध, काटकसरीचा कारभार
अध्यक्ष चंद्रदीप नरके यांची माहिती; कर्जाच्या व्याजात बचत केली

कुडित्रे, ता. १२ ः मागील शंभर व गतहंगामातील शेवटचे बिल लवकरच देणार आहोत. डिस्टिलरीचे कोणतेही विस्तारीकरण सुरू नाही. व्यवस्थापन खर्चात कोणताही वारेमाप खर्च होत नाही. याउलट कर्जाच्या व्याजात बचत केली असून, नियोजनबद्ध कारभार सुरू आहे, असा खुलासा अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी केला.
आज मोर्चानंतर पत्रकार बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले की, यावर्षी ३०४५ प्रमाणे एफआरपी दिली असून, उर्वरित उसाचे बिल दहा ते बारा दिवसांत देणार आहोत. देशभरात साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखरेला ३१०० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे एफआरपी आणि साखर दर यामध्ये सुमारे पाचशे रुपयांचा अपुरी दुरावा निर्माण झाला आहे. २०१७ पासून एफआरपी देण्यासाठी दरवर्षी १५ ते २७ कोटी असे कर्ज वाढले आहे. एकूण २३० कोटींचे कर्ज असून यामध्ये साखरेचे ९० कोटी कर्ज आहे. इतर सर्व तऱ्हेचे कर्ज रुटीनमधील आहे. विरोधकांच्या काळातही सुमारे शंभर कोटींची देणी होती.
अनेक साखर कारखान्यांच्या कामगारांचे पगार थकले आहेत. साहजिकच विरोधकांनी आत्मचिंतन करावे. सध्या नियोजनबद्ध कारभार सुरू असून, व्याजात बचत केली आहे. एफआरपी वेळेत दिली आहे; परंतु चुकीचे आरोप केले जात आहेत.
यावेळी उपाध्यक्ष निवास वातकर, संचालक जयसिंग पाटील, आनंदा पाटील, भगवान पाटील, बाजीराव शेलार, विलास पाटील, संजय पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kdt22b01892 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top