पान ७ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ७
पान ७

पान ७

sakal_logo
By

गोकुळचे सभासदत्व नाकारणारी एकमेव संस्था
वाकरेतील शेतकरी दूध संस्थेचा आदर्श; ठरावाच्या घोडेबाजारला मूठमाती देणारी संस्था

कुंडलिक पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. १९ : सहकारातील २५ वर्षे ठरावाच्या घोडेबाजारला मूठमाती देणारी एक शेतकऱ्यांची दूध संस्था आहे. येथे सभासदांसाठी, आणि मतासाठी निर्णय न घेता दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. संघाचे सभासदत्व नको म्हणणारी जिल्ह्यातील वाकरे (ता. करवीर) येथील शेतकरी दूध संस्था ही एकमेव संस्था असून जिल्ह्यातील संस्थांना आणि राजकारण्यांना या संस्थेचा आदर्श आहे. ५० वर्षांत जिल्ह्याचा दूध, दुधाची धवलक्रांती झाली आहे. मात्र त्या पटीत राजकारणही वाढले आहे. गलोगल्लीत एक दूध संस्था असे चित्र असून जिल्ह्यात सुमारे सहा ते सात हजार दूध संस्था आहेत.

अनेक ठिकाणी एखादा कार्यकर्ता भावकी आणि आपल्या काखेतील लोक नागरिक एकत्र करून संस्था स्थापन करायची आणि ती गोकुळसारख्या संघाच्या ठिकाणी नोंदणी करायची पुढे त्यातून पैसा आणि राजकारण सुरू करायचे हा एक फंडा निर्माण झाला आहे. या सर्व प्रकाराला बगल देत वाकरे येथे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी सहकारी दूध संस्था २५ वर्षांपूर्वी स्थापन झाली. येथे दुधाचे फॅट आणि एसएनएफ कॉम्प्युटरला फक्त संघाचे कर्मचारी हाताळतात किंवा दुरुस्त केले जाते. यामुळे येथे काटा आणि फॅट मारीला थारा नाही.
अनेक ठिकाणी पंचवीस वर्षात मोठ्या इमारती उभारल्या आहेत, मात्र येथे एकाच खोलीत संस्था सुरू आहे, गाईच्या म्हशीच्या दुधाला ‘एसएनएफ’वर दर दिला जातो. उत्पादकांचा प्रायव्हेट फंड घेतला जातो, आणि संस्था ही इतकीच रक्कम भरते. सभासदांच्या घरी दुःखद घटना घडल्यास आर्थिक मदत दिली जाते. इतर संस्था दूध संघाला सभासद होण्यासाठी धडपडत असतात, मात्र ही एकमेव संस्था आहे, सभासद होऊ नये. अशी त्यांची इच्छा आहे. दरम्यान, राजकीय क्षेत्रातून या संस्थेला सभासद करण्यासाठी अट्टाहास सुरू आहे.


कोट
दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दर देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ठरावासाठी संस्था काम करत नाही, दूध उत्पादक शेतकरी यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात.
२५ वर्षे निवडणूक बिनविरोध आहे.
- पी. जी. पाटील, अध्यक्ष, शेतकरी दूध संस्था

Web Title: Todays Latest Marathi News Kdt22b01936 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top