टुडे ४ मेन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे ४ मेन
टुडे ४ मेन

टुडे ४ मेन

sakal_logo
By

आधी काळाबाजार, आता सर्व्हर डाउन

दाखल्यांसाठी विद्यार्थी, पालकांचे हेलपाटे; करवीरमध्ये एक आठवडा दाखले प्रलंबित


कुंडलिक पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. ३० ः आधी दाखल्यांचा काळाबाजार सुरू असल्याची चर्चा होती, नंतर आता सर्व्हर डाउन आहे.
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच करवीर तालुक्यातील महा ई-सेवा केंद्रांचा सर्व्हर डाउन असल्याने विद्यार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
तसेच तालुक्यात आय. डी. पासवर्ड बाहेर वापरला जातो?, असा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. सर्वसामान्य नागरिक मात्र दाखल्यांसाठी प्रतीक्षेत आहेत. तहसीलदार यंत्रणेने मात्र असा काही प्रकार नसल्याचा दावा केला आहे.
तालुक्यात सुमारे ४०० महा ई-सेवा केंद्र आहेत. आता नवीन वर्षात शाळा सुरू झाली आहे. विविध परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी, पालक दाखले काढण्यासाठी महा ई-सेवा केंद्रावर हेलपाटे मारत आहेत. तहसीलदार कार्यालयात दाखले देण्यासाठी संगणकावर तीन डेस्क आहेत, पहिला डेस्क लिपीक पाहतो, तो दाखला पुढचे अधिकारी पाहतात, नंतर तिसऱ्या वेळी नायब तहसीलदार तपासणी करून दाखला ऑनलाईन सोडतात.
मिळालेल्या माहितीनुसार एक आठवडा सर्व्हर डाउन असल्यामुळे महा ई-सेवा केंद्रावरून आलेले दाखले प्रलंबित असून आज पहिल्या डेस्कवर सुमारे ५००, दुसऱ्या डेस्कवर १००, तर तिसऱ्या डेस्कवर १५० दाखले प्रलंबित आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र नाव न सांगण्याच्या अटीवर एका महा सेवा केंद्र चालकाने दोन-तीन दिवसांपूर्वी पाच हजार दाखले एकाच डेस्कवर प्रलंबित असल्याचे सांगितले.

कोट
एक आठवडा सर्व्हर डाउन आहे. मुंबईहून दररोज आज सुरू होईल, असे सांगितले जाते, आय. डी. पासवर्ड बाहेर असेल, तर गोपनीय तक्रार द्यावी.
- विपीन लोकरे, नायब तहसीलदार करवीर

Web Title: Todays Latest Marathi News Kdt22b01948 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top