यंदाही पुरात बुडणार का , करवीर पंचायत समिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यंदाही पुरात बुडणार का , करवीर पंचायत समिती
यंदाही पुरात बुडणार का , करवीर पंचायत समिती

यंदाही पुरात बुडणार का , करवीर पंचायत समिती

sakal_logo
By

01732
कोल्हापूर ः करवीर पंचायत समितीच्या इमारतीत गत जुलैमध्ये आलेले महापुराचे पाणी.
--
करवीर पंचायत इमारतीला पुराचा धोका
यंदाही पाणी घुसून नुकसानीची शक्यता; अधिकारी, कर्मचाऱ्यांना धास्ती

कुंडलिक पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. ५ ः करवीर पंचायत समिती इमारतीचे भिजत घोंगडे पडले आहे. दोन वेळा महापुरात कार्यालय बुडाले होते, यंदाही करवीर पंचायत समिती कार्यालय पुरात बुडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुराची अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धास्ती घेतली असून, यावेळी कार्यालय पुरात बुडाल्यास होणाऱ्या नुकसानीस अधिकारी कर्मचारी जबाबदार राहणार नाहीत? असे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
ऑगस्ट २०१९ महापुरात पंचायत समिती कार्यालयात महापुराचे पाणी आले होते. त्यावेळी अभिलेख पाण्यात भिजून खराब झाले. महापुरात कार्यालयातील टेबल, खुर्ची, कपाटे, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिक साहित्य खराब झाले होते. त्यावेळी अनेक अडचणी निर्माण झालेल्या होत्या. कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जमेल त्या फाईल, कागदपत्र वाचविले होते.
गतवर्षी २३ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे महापुराचे पाणी पुन्हा कार्यालयात आले होते. त्यावेळी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अभिलेख, संगणक, प्रिंटर असे जमेल तेवढे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले; परंतु महापुराच्या पाण्यामुळे कार्यालयातील अवजड वस्तू, कपाट, खुर्च्या, टेबल व इतर साहित्य, कायमस्वरूपी बसविलेल्या वस्तू उचलणे शक्य झाले नाही. महापूर गेल्यानंतर आमदार, अधिकारी भेट देतात, पुढे मात्र कार्यवाही काही होत नाही.
--
अधिकारी, कर्मचाऱ्यांचे
सीईओंना निवेदन
पंचायत समिती व अधिनस्त विविध विभागासाठी प्रशासकीय इमारत नसल्याने कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कार्यालयातील सर्व विभागाकडील अभिलेख कायमस्वरूपी जतन करून ठेवणे आवश्यक आहे. यासाठी निवेदन सोमवार (ता. ४) रोजी करवीर पंचायत समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.

लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा
करवीरला चार आमदार, तर जिल्ह्यात तीन खासदार लाभले आहेत. या लोकप्रतिनिधींकडून पंचायत समितीला दर पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kdt22b01955 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..