टुडे ४ मेन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे ४ मेन
टुडे ४ मेन

टुडे ४ मेन

sakal_logo
By

02527
02526

शिंगणापूर फाटा ः येथे गटारीतील रस्त्यावर तुंबलेले पाणी.
---------

शिंगणापूर फाट्यावर ‘डर्टी पिक्चर’
---
गटार तुंबून सांडपाणी रस्त्यावर; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
कुंडलिक पाटील ः सकाळ वृत्तसेवा
बालिंगा, ता. १९ ः कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर शिंगणापूर फाट्यावर गटारीचे पाणी दोन फूट तुंबले आहे. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. महापालिकेच्या हद्दीत या गटारी असून, महापालिकेने तातडीने पाण्याचा निचरा करून द्यावा, गटार स्वच्छ करावी, अशी मागणी होत आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर शिंगणापूर फाट्याच्या पुढे ५० फुटांवर सार्वजनिक बांधकाम खात्याची हद्द लागते. यामुळे येथील हद्द ही महापालिकेची आहे. या ठिकाणी शिंगणापूर फाटा येथे मटण विक्री व विविध दुकानांची गर्दी असते, तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या ठिकाणी मुख्य रस्त्यालगत शिंगणापूर फाट्यावर गेले अनेक दिवस गटारीचे पाणी तुंबून राहिले आहे, यामुळे दुर्गंधी पसरली असून, येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेला जाणारे विद्यार्थी आणि चालणारे नागरिक या तुंबलेल्या गटारीच्या पाण्यातून मार्ग काढत आहेत. संबंधित खात्याने तातडीने गटारीतील कचऱ्याची स्वच्छता करून पाण्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी होत आहे. शिंगणापूर ग्रामपंचायतीने पाणी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा निचरा होऊ शकत नाही, अशी माहिती सरपंच प्रकाश रोटे यांनी दिली.


कोट
बरेच दिवस पाणी तुंबून राहिले आहे. मटण विक्री आणि कचरा व दूषित पाणी या गटारीत साठलेले असते, यातून नागरिक ये-जा करतात. त्यांना त्वचारोग होईल, असे चित्र आहे.
- महेश पाटील, शिंगणापूर

Web Title: Todays Latest Marathi News Kdt22b01977 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..