डी.सी.नरके विद्यानिकेतन व ज्युनि.काॅलजमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी, विद्यार्थी सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डी.सी.नरके विद्यानिकेतन व ज्युनि.काॅलजमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी, विद्यार्थी सत्कार
डी.सी.नरके विद्यानिकेतन व ज्युनि.काॅलजमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी, विद्यार्थी सत्कार

डी.सी.नरके विद्यानिकेतन व ज्युनि.काॅलजमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी, विद्यार्थी सत्कार

sakal_logo
By

02616
कुडित्रे ः डी. सी. नरके विद्यानिकेतन व ज्युनि. कॉलेजमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी, गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी चंद्रदीप नरके, अजित नरके, पी. टी. पाटील.

‘नरके विद्यानिकेतन’मध्ये
गुणवंतांचा सत्कार

कुडित्रे, ता. १६ ः येथील डी. सी. नरके विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलजमध्ये कुंभी-कासारी शिक्षण प्रसारक मंडळ कुडित्रे व जनता शिक्षण प्रसारक मंडळ कोतोली संचालित विविध शाळांमधील गत तीन वर्षांतील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा व १० वी व १२ वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी. टी. पाटील यांच्या हस्ते व संस्थेचे संचालक, गोकुळचे संचालक व कुंभी-कासारी सहकारी बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. विद्यार्थी, पालक व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. सचिव पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले. माजी आमदार व कुंभी कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही संस्थांमधून निवृत्त झालेल्या एकूण १६ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
रामदास झेंडे यांचा शिक्षक बँकेमध्ये संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल व ज्योतिर्लिंग हायस्कूल, बोरगावचे मुख्याध्यापक डी. एस. लव्हटे यांची मुख्याध्यापक संघ विज्ञान विभाग अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य ए. एम. पाटील, पर्यवेक्षक एन. एन. काळोलीकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kdt22b02025 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..