नागदेववाडी येथे श्रावण पालखी भेट सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागदेववाडी येथे श्रावण  पालखी भेट सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न
नागदेववाडी येथे श्रावण पालखी भेट सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न

नागदेववाडी येथे श्रावण पालखी भेट सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न

sakal_logo
By

02618
नागदेववाडी ः येथील श्रावणातील तीन वर्षांनी येणाऱ्या तिसऱ्या श्रावण सोमवारचा शिंगणापूर, हणमंतवाडी आणि नागदेववाडी येथील ग्रामदैवतांच्या उपस्थितीतला पालखी भेट सोहळा. (छाया ः जयवंत निगडे, नागदेववाडी)

हणमंतवाडी, नागदेववाडीतील
ग्रामदैवतांचा पालखी भेट सोहळा

बालिंगा, ता. १६ ः नागदेववाडी (ता. करवीर) येथे श्रावण महिन्यात तीन वर्षांनी येणारा तिसरा श्रावण सोमवार पालखी भेट सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात झाला. शिंगणापूर, हणमंतवाडी आणि नागदेववाडी या तिन्ही गावचे आराध्य दैवत असलेल्या नागनाथ देवालयावर विद्युत रोषणाई केली होती. सकाळी नागनाथांच्या मूर्तीस पुजारी सुनील गुरव यांनी अभिषेक घातला व वस्त्रालंकार घालून फणा बांधली व पूजा, आरतीनंतर मूर्ती देवदर्शनासाठी खुली केली.
श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार व तीन वर्षांतून येणारा तिसरा सोमवार या तीन गावांमध्ये मुख्य सोहळा मानला जातो. भाविक, पाहुणे व माहेरवाशीणींनी देवदर्शनासाठी गर्दी केली. दुपारी दोन वाजता शिंगणापूर, हणमंतवाडी येथील पालख्यांचे भेटीच्या सोहळ्यासाठी आगमन झाले. ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करून देवस्थान समितीने स्वागत केले.
एकमेकांना भेटींचा मानपान देण्यात येऊन, भेट होऊन सोहळा झाला. गुलाल, भंडाऱ्याची उधळण करीत सासनकाठ्यांसह गावातून पालख्यांची मिरवणूक काढण्यात आली. सोहळा पाहण्यासाठी व देवदर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळे, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Kdt22b02026 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..