शेतकऱ्यांची दमछाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांची दमछाक
शेतकऱ्यांची दमछाक

शेतकऱ्यांची दमछाक

sakal_logo
By

आधार लिंकसाठी शेतकऱ्यांची दमछाक
प्रोत्साहन अनुदानाचे रडगाणे; मुदत वाढविण्याची मागणी
कुंडलिक पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. ३० ः शेतकरी प्रोत्साहन अनुदान मिळविण्यासाठी, बँक खाते आधार लिंक करण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक उडाली आहे. शेतकरी कामे टाकून सेवा सोसायटी आणि बँकेत हेलपाटे मारत आहेत. मयत शेतकऱ्याचा वारस एकच असल्यास, दोन पीक कर्ज खात्याचे लाभ मिळणार का?, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रोत्साहन अनुदानाचे पैसे जमा करण्यासाठी जिल्हा बँकेतील बचत खाते आधारशी लिंक असलेच पाहिजे, असा तगादाही विकास संस्थांनी लावला आहे. शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी असून आधार लिंक करण्याची तारीख वाढवावी, अशी मागणी होत आहे.
आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे, हे पहिले पाहावे लागते. आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक बंद असल्यास त्याचा ‘ओटीपी’ त्याच नंबरवर जात आहे. यामुळे आधारशी मोबाईल लिंक करण्यासाठी शेतकऱ्यांची सुरुवात होते. यानंतर बँकेत असणारे जनधन खाते व्यवहार न झाल्यामुळे व जादा रक्कम झाल्यामुळे बंद पडले आहे. यामुळे पुन्हा नवीन खाते काढण्यासाठी शेतकरी हेलपाटे मारत आहेत.
बँकेत नवीन खाते काढण्यासाठी पॅनकार्ड सक्तीचे केले आहे. यामुळे घरी पॅनकार्ड सापडत नाही. पॅनकार्ड काढण्यासाठी शेतकरी आयकर विभागात हेलपाटे मारत आहेत. एकाच शेतकऱ्याची दोन खाती आधारशी लिंक होत नाहीत. इतर बँकेत खाते लिंक आहे. त्यांची अडचण झाली आहे. मयत शेतकऱ्यांच्या घरी वारसाने कागदपत्रे पूर्ण न केल्याने पुन्हा अडचणीत भर पडली आहे.
-
वारसांना लाभ द्या
वारस शेतकरी खातेदार मयत झाल्यास तसेच वारस एकच असल्यास बँक खाते एकाच आधारशी लिंक होऊ शकते, यामुळे दोन खात्याचा लाभ एका शेतकरी वारस लाभार्थ्याला मिळणार का? अनेक वर्ष पीक कर्ज उचलले, मात्र तीन वर्षात एकदाच पीक कर्ज उचलले, अशा शेतकऱ्यांना लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे.

काही शेतकऱ्यांचा डिसेंबरमध्ये ऊस तुटला, मात्र काही कारखान्यांनी साधारण जुलैमध्ये बिल दिले, यामुळे खाती फिटली नाहीत. अशा शेतकऱ्यांवर अन्याय होतो आणि दरवर्षी सेवा सोसायटी आणि बँकांच्या माध्यमातून पीक कर्ज घेतले जाते. मात्र, पुन्हा लिंकची सक्ती कशासाठी.
- एकनाथ पाटील, अध्यक्ष, यशवंत बँक

Web Title: Todays Latest Marathi News Kdt22b02045 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..