पान २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान २
पान २

पान २

sakal_logo
By

सांगरूळमधील महिलेच्या
अवयवदानातून तिघांना जीवदान
सांगरूळ, ता. ३१ ः येथील एका महिलेला डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयवदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. या महिलेच्या अवयवदानामुळे तीन रुग्णांना जीवदान मिळाले आहे. येथील एका ४० वर्षीय महिलेला २९ ऑगस्टला अस्वस्थ वाटू लागल्याने घरच्यांनी त्यांना गावातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना हृदयविकाराचा धक्का बसल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यास सांगितले. कोल्हापूरला जाताना वाटेतच त्या बेशुद्ध झाल्या. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी (ता. ३०) रात्री डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड म्हणून घोषित केले. घरातील एकमेव करत्या-सवरत्या स्त्रीचे निधन झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबीयांनी दुःखातून सावरून या महिलेचा अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. खासगी रुग्णालयात त्यांच्या दोन्ही किडनी, यकृत दान करण्यात आले. ग्रीन कॉरिडॉरमार्फत एक किडनी पुण्यातील रुग्णालयातील रुग्णाला, तर एक किडनी कोल्हापुरातील रुग्णाला, तसेच यकृत सोलापूर येथील रुग्णालयातील एका रुग्णाला दान करण्यात आले.

अवयवदान सत्कार्य
अवयव दान हे एक महत्त्वाचे सत्कार्य आहे. त्यासाठी राज्यस्तरावरील समिती आहे. अवयवाची गरज आहे, त्यांनी या समितीकडे नावनोंदणी केल्यानंतर ज्याचा नंबर अग्रक्रमाने पुढे असेल त्याला त्याच्या आवश्यकतेनुसार अवयवाचे प्रत्यारोपण केले जाते. त्यासाठी रुग्णाच्या प्रकृतीची वैद्यकीय चाचणी घेतली जाते.
यात अवयव या शरीराला जोडू शकेल का? याचाही अंदाज घेतला जातो. त्यानंतर अवयवाचे प्रत्यारोपण केले जाते. तेव्हा त्याचा जीव वाचू शकतो. त्यासाठी अवयवदानाचे महत्त्व सर्वांनी समजून घेणे व अवयव दान करणे हे एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी महत्त्वाचे ठरते.

Web Title: Todays Latest Marathi News Kdt22b02049 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..