कुंभीचे १०० रुपये ऊस बिल अदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभीचे १०० रुपये ऊस बिल अदा
कुंभीचे १०० रुपये ऊस बिल अदा

कुंभीचे १०० रुपये ऊस बिल अदा

sakal_logo
By

52165

कुंभी कारखान्यातर्फे
जादा १०० रुपये आदा
माजी आमदार चंद्रदीप नरके; २०१७-१८ च्या हंगामातील बिल
कुडित्रे, ता. २३ ः कुंभी-कासारी कारखान्याने दसरा व दिवाळीसाठी २०१७-१८ मधील एफआरपीपेक्षा जादा प्रतिटन १०० रुपये बिल संबंधित ऊस पुरवठाधारकांचे बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती अध्यक्ष माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली. २०१७-१८ ची एफआरपीसंदर्भात कारखानदार आणि शेतकरी संघटनेत ठरल्यानुसार साखर कारखान्यांनी एफआरपी अधिक जादा दर जाहीर केला होता. कुंभीने हंगाम २०१७ -१८ साठी एफआरपी २९०० रुपये अधिक १०० रुपये असा ऊस दर जाहीर केला होता.
कारखान्याने १० नोव्हेंबर २०१७ ते १५ डिसेंबर २०१७ अखेर १ लाख ९१ हजार ३६९.८०७ टन उसाचे बिल एफआरपी. अधिक १०० रुपये असे प्रतिटन ३ हजारांप्रमाणे आदा केले आहे. तथापि १६ डिसेंबर १७ ते १७ मार्च २०१८ अखेर ४ लाख ४० हजार ८७२.५५२ टन उसाचे प्रतिटन २९०० रुपयांप्रमाणे ऊस बिल आदा केले होते. यातील प्रतिटन १०० रुपयांप्रमाणे एफआरपी पेक्षा जादा असणारी बिलाचे रुपये ४ कोटी ४० लाख ८७ हजार रक्कम देय रक्कम ऊस पुरवठाधारकाचे बँक सेव्हिंग्ज खात्यावर वर्ग केली आहे.
ऊस उत्पादक, संचालक मंडळ, तोडणी वाहतूक यंत्रणा, व्यापारी, कंत्राटदार, अधिकारी व कर्मचारी याचे सहकार्य राहिले असेच सहकार्य कारखान्याचे हंगाम २०२२- २३ चे गळिताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राहावे आणि ऊस उत्पादकांनी पिकविलेला ऊस गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही नरके यांनी केले.
या वेळी उपाध्यक्ष निवास वातकर, संचालक, कार्यकारी संचालक अशोक पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kdt22b02089 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..