
कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्या जाणार ? राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे पुन्हा संकेत
कमी पटसंख्येच्या
शाळा बंद केल्या जाणार?
शालेय शिक्षण विभागाचे संकेत
कुंडलिक पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. २५ ः राज्यभरात शून्य ते वीस विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळा किती आहेत, याची माहिती शालेय शिक्षण विभागाने मागवली असल्यामुळे कमी पटसंख्येच्या शाळा राज्य शासनाकडून बंद केल्या जाणार असल्याचे पुन्हा संकेत मिळत आहेत. वित्तीय उपाययोजना करण्याअंतर्गत पदभरती बंदीच्या अनुषंगाने विविध विषयांबाबतची माहिती, स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी यांनी शिक्षण आयुक्त, माध्यमिक शिक्षण संचालकांकडून मागविल्याची चर्चा आहे.
दरवर्षी ३० सप्टेंबरला पटनिश्चिती मागवली जाते. शासनाकडून कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे प्रयत्न पूर्वीही झाले होते. त्यावेळी शिक्षण क्षेत्रातून विरोध आणि टीका झाली. आता पुन्हा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.
जिल्ह्यात शिक्षकांची तब्बल ९०० पदे रिक्त आहेत. यामुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला असून, भरतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या शाळा टिकल्या पाहिजेत, अशा प्रतिक्रिया पालकांतून व्यक्त होत आहेत.
कोट
तालुक्यांना पत्र व्यवहार केला आहे. भौगोलिक परिस्थिती अडचणीची असल्यामुळे जवळच्या शाळातही मुले जाऊ शकत नाहीत. जिल्ह्यात अंदाजे २० शाळा असू शकतात, जिथे सुविधा उपलब्ध नाही.
- आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद