आहाराचा प्रश्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आहाराचा प्रश्न
आहाराचा प्रश्न

आहाराचा प्रश्न

sakal_logo
By

भाजीपाला, खाद्यतेल अनुदान रखडले
जिल्ह्यात बालकांच्या सकस आहाराचा प्रश्न; मुख्याध्यापकांवर खर्चाचा भार

कुंडलिक पाटील ः सकाळ वृतसेवा
कुडित्रे ता.३ ः जिल्हा परिषद शाळेतील इंधन, भाजीपाला, खाद्यतेलाचे अनुदान रखडल्याने बालकांच्या सकस आहाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.स्वयंपाकी आणि मदतनीसांचे मानधनही प्रलंबित आहे. शासनाने तातडीने अनुदान द्यावे अशी मागणी होत आहे. जिल्ह्यात तीन लाख विद्यार्थ्यांच्या भोजनावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
शालेय पोषण आहार योजनेतून विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनासाठी तांदळासह इतर धान्यांचा पुरवठा केला जातो. परंतु, इंधन, भाजीपाला, खाद्यतेल अनुदान व स्वयंपाकी आणि मदतनीसांचे मानधन रखडले आहे. यामुळे मुख्याध्यापकांना हा खर्चाचा भार सहन करावा लागत आहे.      
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थाना माध्यान्ह भोजन दिले जाते. यामध्ये तांदूळ इतर धान्ये पुरवण्यात येतात. मात्र, गेल्या मार्च, एप्रिल, ऑगस्ट, सप्टेंबरचे इंधन, भाजीपाला, खाद्यतेलाचे अनुदान मात्र दिलेले नाही. हा सर्व खर्च मुख्याध्यापकांना करावा लागत आहे. स्वयंपाकी व मदतनीस यांचे मानधन ही काही तालुक्यांचे दिले आहे, तर काही तालुक्यांचे थकले आहे.
केंद्र ६० टक्के आणि राज्य ४० टक्के अशा संयुक्त अनुदानातून ही योजना राबवली जाते. मात्र, अनुदानच रखडल्याने शाळांसमोर योजना चालवावी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. इंधन, भाजीपाला आणि खाद्यतेलाच्या खर्चाचा समावेश करून प्रतिविद्यार्थी प्रतिदिन इयत्ता पहिली ते पाचवीसाठी दोन रुपये ६८ पैसे आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी चार रुपये २ पैसे, असा अनुदान खर्च दिला जातो. या योजनेसाठी केंद्राची राज्यासाठी १.३१ लाख कोटींची तरतूद असून, ११.२ कोटी शाळा लाभार्थी आहेत. जिल्ह्यात ३ हजार ३९ शाळा असून, पहिली ते आठवीचे तीन लाख ७७ हजार विद्यार्थी लाभ घेतात.

कोट
तेल, इंधन, भाजीपाला या वस्तूंचे अनुदान मार्च- एप्रिल- ऑगस्ट सप्टेंबरचे आलेले नाही. संचालक कार्यालयाकडून माहिती मागविली असून, लवकर हे अनुदान मिळेल अशी अपेक्षा आहे.
-दीपक माने, अकाउंट ऑफिसर, शालेय पोषण आहार विभाग, जिल्हा परिषद,