विविध दाखले काढण्यासाठी विद्यार्थी, पालकांची धावपळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विविध दाखले काढण्यासाठी विद्यार्थी, पालकांची धावपळ
विविध दाखले काढण्यासाठी विद्यार्थी, पालकांची धावपळ

विविध दाखले काढण्यासाठी विद्यार्थी, पालकांची धावपळ

sakal_logo
By

विविध दाखले काढण्यासाठी
विद्यार्थी, पालकांची धावपळ
करवीर तालुका; सारखी अर्जासाठी गरज
कुंडलिक पाटील : सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. १३ : करवीर तालुक्यात विद्यार्थी व पालकांची दाखले काढण्यासाठी धडपड सुरू आहे. मराठा तरुणांना सारखीसाठी शाळेत अर्ज भरण्यासाठी चार दिवसांचा कालावधी असल्याने उत्पन्नाचा दाखला व नॉन क्रिमीलेअर दाखल्याची गरज आहे. पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन विद्यार्थी पालकांचे हाल थांबवावेत, अशी मागणी होत आहे.
तालुक्यात सुमारे २४७ महा ई-सेवा केंद्र आहेत, विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याचे काम सुरू आहे, यासाठी उत्पन्नाचा दाखला डोमिसाईल दाखले आवश्यक असतात. या महिन्यात ५ तारखेला सबमिट केलेल्या अर्जाचे दाखले अद्याप दिले गेलेले नाहीत. यामुळे पालक आणि विद्यार्थी महा-ई-सेवा केंद्रावर हेलपाटे मारताना दिसतात.
एन.एम.एम.एस परीक्षेचा उत्पन्नाचा दाखला सादर करण्यासाठी ३१ ऑक्टोबर अंतिम तारीख आहे, तर मराठा तरुणांसाठी सारखीसाठी १७ ऑक्टोबर अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. उत्पन्नाचे दाखले न मिळाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याचे चित्र आहे.
दरम्यान. तहसील कार्यालयात संपर्क साधला असता फक्त एका दिवसाचे बाराशे दाखले असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत नायब तहसीलदार विपीन लोकरे यांच्याशी संपर्क साधला असता एक ही दाखला पेंडिंग नसल्याचे त्यांनी सांगितले.
------------
कोट
५ ऑक्टोबरला उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी अर्ज केला. अद्याप तारीखच दिली जाते. दाखला न मिळाल्याने विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये.
- युवराज चव्हाण, पालक, दोनवडे