पंचगंगा नदीप्रदूषणाला आळा बसणार का ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचगंगा नदीप्रदूषणाला आळा बसणार का ?
पंचगंगा नदीप्रदूषणाला आळा बसणार का ?

पंचगंगा नदीप्रदूषणाला आळा बसणार का ?

sakal_logo
By

सांडपाणी-घनकचरा प्रकल्प रखडले
---
करवीर तालुक्यातील स्थिती; ५८ पैकी फक्त १३ कामे पूर्ण, प्रदूषण मुक्तीस खो
कुंडलिक पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. १५ : पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर आहे. यात करवीर तालुक्यातील काही गावे आघाडीवर आहेत. तालुक्यात सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर होऊन एक वर्ष झाले तरी ५८ पैकी फक्त १३ प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन कामास गती नसल्याने पंचगंगा नदी प्रदूषणाला आळा बसणार कधी? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
२०२१-२२ मध्ये करवीर तालुक्यातील ५८ गावांत सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर झाले आहेत. यासाठी स्वच्छ भारत अभियानमधून सुमारे ८१ लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली होती. दरम्यान, यात ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून ३० टक्के निधी द्यावा लागणार होता.
सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी निधीची मागणी वारंवार होत होती. जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियान दुसऱ्या टप्प्यात सांडपाणी व्यवस्थापन करणे आणि घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी १५०० पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या ५८ ग्रामपंचायतींना निधी मंजूर करण्यात आला.
काम मात्र संथ गतीने असल्याचे चित्र आहे. सांडपाण्याच्या २८ पैकी फक्त पाच कामे पूर्ण झाली आहेत, तर घनकचरा प्रकल्पाची ३० पैकी फक्त आठ कामे पूर्ण झाली. १४ कामे अद्याप सुरू नाहीत. त्यामुळे घनकचऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
-------------------
चौकट
३१ मार्चअखेर कामे होती अपेक्षित
सांडपाणी व्यवस्थापनासाठी ६७ लाख ३२ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली होती. यात स्वच्छ भारत अभियानमधून ४७ लाखांचा निधी आणि १५ व्या वित्त आयोगातून २० लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, ३१ मार्च २०२२ अखेर सांडपाणी व्यवस्थापनाचे काम पूर्ण करावे लागणार होते. अन्यथा, पुढच्या आर्थिक वर्षात निधी उपलब्ध होणार नाही, याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असणार, असे ग्रामीण पाणीपुरवठा सूत्रांनी सांगितले होते. तसेच, या प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती यापुढे वीज-पाणी जोडणी अशी कामे संबंधित ग्रामपंचायतींना यापुढे करावी लागणार आहेत.
----------------------
कोट
सांडपाणी घनकचरा प्रकल्पांमुळे पंचगंगा नदी प्रदूषणाला आळा बसेल. असे प्रकल्प काळाची गरज आहे. पंचायत समितीत सदस्य नसल्याने मरगळ आली. सदस्य असताना यंत्रणांना सक्रिय करून असे प्रकल्प पूर्ण केले जात होते.
- अविनाश पाटील, माजी उपसभापती, पंचायत समिती, करवीर