कुंभी हंगाम शुभारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभी हंगाम शुभारंभ
कुंभी हंगाम शुभारंभ

कुंभी हंगाम शुभारंभ

sakal_logo
By

02819
कुडित्रे : कुंभी हंगाम प्रारंभप्रसंगी अध्यक्ष चंद्रदीप नरके, उपाध्यक्ष निवास वातकर, संचालक भगवान पाटील, जयसिंग पाटील, आनंदा पाटील, संजय पाटील व सर्व संचालक.
..................................

१०० लाख टन निर्यातीचे आदेश द्या
चंद्रदीप नरके : कुंभी कारखान्याचा हंगाम प्रारंभ

कुडित्रे, ता. १८ : साखर उद्योग सावरण्यासाठी केंद्र शासनाने १०० लाख टन साखर निर्यातीचे तातडीने आदेश द्यावेत आणि साखरेला ३६ रु. दर निश्चित करावा, अशी मागणी माजी आमदार, कुंभी कारखाना अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी केली, आज कुंभी कारखाना येथे गाळप हंगाम प्रारंभ झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नरके म्हणाले, ‘या हंगामामध्ये ७ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून, यासाठी ९ हजार ५५० हेक्टर उसाची नोंद झाली आहे. या हंगामाकरिता पुरेशी ऊस तोडणी यंत्रणा असून सर्व ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक यंत्रणा, कामगार यांनी संपूर्ण ऊस पाठवून सहकार्य करावे.’
शासनाने साखर माल तारण, अल्प व मध्यम मुदत कर्जाचे व्याजदर कमी करावेत, अशी मागणी केली. केंद्र शासनाने इथेनॉल प्रकल्पासाठी अनुदान द्यावे ,तसेच यंदा सर्वत्र साखरेचे अतिरिक्त उत्पादन होणार आहे, यामुळे साखर उद्योग सावरण्यासाठी केंद्र शासनाने १०० लाख टन साखर निर्यातीसाठी आदेश काढावे, तसेच साखर उद्योगाला सावरण्यासाठी ३६ रुपये साखर दर निश्चित करावा, अशी मागणी केली.
यावेळी काटापूजन व गव्हाणीत मोळी टाकून प्रारंभ झाला. यावेळी उपाध्यक्ष निवास वातकर, संचालक भगवान पाटील, जयसिंग पाटील, आनंदा पाटील, संजय पाटील, सर्व संचालक,कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, सचिव प्रशांत पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.