एका छताखाली सर्व सेवा देणारी कुडित्रे आदर्श ग्रामपंचायत,चंद्रदीप नरके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एका छताखाली सर्व सेवा देणारी कुडित्रे आदर्श ग्रामपंचायत,चंद्रदीप नरके
एका छताखाली सर्व सेवा देणारी कुडित्रे आदर्श ग्रामपंचायत,चंद्रदीप नरके

एका छताखाली सर्व सेवा देणारी कुडित्रे आदर्श ग्रामपंचायत,चंद्रदीप नरके

sakal_logo
By

02825
कुडित्रे ः येथे शिलाई वस्तू वाटपावेळी चंद्रदीप नरके, सरपंच ज्योत्स्ना पाटील, विश्वराज महाडिक, संताजीबाबा घोरपडे.
-----------

कुडित्रेला निधी मिळवून देणार
चंद्रदीप नरके ः शिलाई मशीन वाटपसह विविध कार्यक्रम
कुडित्रे ता. १९ ः सर्व सेवा एका छताखाली देणारी कुडित्रे आदर्श ग्रामपंचायत असून या गावाच्या विकासासाठी शासनाकडून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.         
ग्रामपंचायतीच्या पहिला मजला विस्तारीकरण, सरपंच कक्ष व कार्यालय सुशोभीकरण, निराधार महिलांना शिलाई मशीन वाटप, अंगणवाडीसेविका तिजोरी वाटप व सत्कार समारंभात नरके बोलत होते. अध्यक्षस्थानी निवृत्त कार्यकारी संचालक भिकाजी गायकवाड होते. विश्वराज महाडिक यांनी खासदार धनंजय महाडिक यांनी पाच वर्षांत अनेक विकासकामे केल्याचे सांगून केंद्र व राज्य सरकारकडून विकासकामे करून घेऊ, अशी ग्वाही दिली. कुंभी कासारीचे संचालक बाजीराव शेलार, संताजीबाबा घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले.
सरपंच ज्योत्स्ना पाटील यांनी विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी सदस्य उर्मिला पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. महिलांना शिलाई वस्तू वाटप, विस्तारीकरण उद्घाटन आणि मान्यवरांचा सत्कार झाला. कार्यक्रमाला उपसरपंच सुवर्ण भास्कर, कुंभी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील, कुंभीचे माजी संचालक मदन पाटील, माजी सरपंच बाळ पाटील, पांडुरंग पाटील- माजगावकर, महादेव माळी, राजाराम कदम, आर. जी. कुंभार, टी. ए. शेलार, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.