तलाठ्यांची बढती झाली भरती कधी ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलाठ्यांची बढती झाली भरती कधी ?
तलाठ्यांची बढती झाली भरती कधी ?

तलाठ्यांची बढती झाली भरती कधी ?

sakal_logo
By

तलाठ्यांची बढती
झाली, भरती कधी ?

जिल्ह्यात तलाठ्यांच्या ३४ जागा रिक्त

कुंडलिक पाटील
कुडित्रे, ता. २ : जिल्ह्यात तीन वर्षानंतर महसूल विभागात तलाठ्यांची बढती झाली आहे. मात्र ३४ जागा रिक्त असल्यामुळे तलाठी भरती कधी होणार 0 असा प्रश्न आहे. तलाठ्यांचे सर्कल झाले, यामुळे तलाठ्यांची संख्या पुन्हा कमी झाली, परिणामी शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे. यामुळे तातडीने तलाठी भरती करावी अशी मागणी होत आहे. जिल्ह्यात सुमारे ४६० तलाठी कार्यरत आहेत. कोरोनामुळे भरती व बढती रखडली होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच १४ तलाठ्यांची बढती केली, तलाठी सर्कल झाले ,मात्र पुन्हा रिक्त असलेल्या जागांमध्ये वाढ झाली आहे, यामुळे जिल्ह्यात ३४ जागा तलाठ्यांच्या रिक्त राहिल्या आहेत. शेतकऱ्यांना सातबारा देणे, पी एम किसान ,कर वसुली ,विमा अशी कामे तलाठी याना करावी लागतात, तलाठी यांची संख्या कमी असल्यामुळे अशी कामे प्रलंबित पडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या विकासावर परिणाम होत आहे.
मंत्री गटाने २०१७ मध्ये सजा पुनर्रचना केली. मात्र पदे भरण्यासाठी आदेश काढला नाही. शहराशेजारी नागरीकरणाचा वेग वाढला आहे. यामुळे जमिनी एनए करणे, प्लॉटीकरण करणे, अशी कामे दिवसेंदिवस वाढत आहेत ,सज्जा पुनर्रचना नसल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. तलाठ्यांच्या रिक्त पदामुळे जिल्ह्याच्या महसुलावर परिणाम होत आहे ,सजा फोड करून तलाठी भरती होणे अनिवार्य होते, नवीन तलाठी भरती प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे.
जिल्ह्यात सर्वात मोठा करवीर तालुका असून करवीर तालुक्यात १४ तलाठी पदे रिक्त असलेची माहिती महसूल सूत्रांनी दिली आहे.

कोट
तलाठी भरती व्हावी,जनसेवा व्हावी,स्वच्छ कारभार व्हावा, शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात.
- डॉ. के. एन. पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण

कोट
कोविडमुळे तीन वर्षे बढती झाली नाही. भरतीसंदर्भात शासनाने माहिती मागविली आहे. महसूलमंत्री, तलाठी जागा भरतील, अशी आशा आहे.
- अनंत दांडेकर, सरचिटणीस जिल्हा तलाठी संघ