कोपार्डे येथे पाण्याचा टणटणाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोपार्डे येथे पाण्याचा टणटणाट
कोपार्डे येथे पाण्याचा टणटणाट

कोपार्डे येथे पाण्याचा टणटणाट

sakal_logo
By

कोपार्डे येथे पाण्याचा ठणठणाठ
तीन दिवसांतून एकदा पाणी; दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप
कुडित्रे, ता. ३ : कोपार्डे (ता. करवीर) येथे पिण्याच्या पाण्याचा ठणठणाठ निर्माण झाला आहे. गाळ काढण्यासाठी जॅकवेलमध्ये काम सुरू होते, यामुळे तीन दिवसांतून एकदा पाणी येते, अशी तक्रार महिलांनी व विरोधी गटातील सदस्यांनी केली आहे, तर सत्ताधारी गटाकडून पाणी सुरळीत सुरू असल्याचा खुलासा केला आहे.
विरोधी गटाचे श्रीधर पाटील, सदस्य मिताली पाटील यांनी सत्ताधारी गटाकडून गावाला वेठीस धरले जाते. तीन दिवसांतून एकदा पाणी सोडले जाते. लोकसहभागातून गाळ काढला असून, ५० हजार रुपये खर्च टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आधी गाळ काढला आणि नंतर टेंडर केले जात आहे. नंदीवाले वसाहतमध्ये गेली पंचवीस दिवस पाणी नाही. पाणी सुरळीत द्यावे, अन्यथा शनिवारी (ता. ५) ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढणार आहे, असा इशारा दिला आहे.
सत्ताधारी गटाकडून सांगण्यात आले की, १२ ऑक्टोबर रोजी जॅकवेल चोकअप झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे नवीन बाहेरील मोटर बसवून पाणीपुरवठा सुरळीत चालू केला आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये तातडीची मीटिंग बोलवली. मीटिंगमध्ये आमच्या सहा सदस्यांचे मत असे झाले की गावाचा पाणीप्रश्‍न हा अति तातडीचा असून, सरपंचांनी असा निर्णय घ्यावा, की तातडीने गाळ काढण्याचे काम सुरू करावे. त्याच्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता ही सुरू करावी. विरोधी गटाच्या पाच सदस्यांचे मत असे झाले की, प्रोसेसनुसार काम करावे, एका सदस्याचे मत असे आले की आधी प्रोसेस पूर्ण करावी आणि मग गाळ काढावा. सरपंच शारदा नामदेव पाटील यांनी असा निर्णय घेतला की, गावाला आपण पाण्यासाठी वेठीस धरू शकत नाही, त्यासाठी तातडीने गाळ काढणाऱ्या व्यक्तीस बोलवले आणि त्याला गाळ काढण्यास सांगितले.
उपसरपंच सरदार आमदार म्हणाले, ‘‘दिवाळी सणाचा प्रारंभ होता आणि त्यानंतर कागदोपत्रांची पूर्तता पूर्ण केल्यानंतर टेंडर फोडणेसाठी मीटिंगचे नियोजन केले. त्या मीटिंगसाठी विरोधी पाच सदस्य हजर न राहता अप्रत्यक्षरीत्या विरोध दर्शवला एका सदस्याने असा अर्ज दिला की, हा गाळ लोकसहभागातून काढलेला आहे आणि त्यात सदस्यांनी व्हिडिओ करून सांगितले की गाळ कर्मचाऱ्यांनी काढला, अशी ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विरोधक सत्तेच्या हव्यासापोटी राजकारण करत आहेत. आमचे काम सुरळीतपणे असून, आज पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे.’’