दूषित पाण्यामुळे अतिसाराचे रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दूषित पाण्यामुळे अतिसाराचे रुग्ण
दूषित पाण्यामुळे अतिसाराचे रुग्ण

दूषित पाण्यामुळे अतिसाराचे रुग्ण

sakal_logo
By

दोनवडेत दूषित पाण्यामुळे अतिसाराचे रुग्ण

कुडित्रे, ता. १६ ः भोगावती नदीला पाणी साचून राहिले असून ते काळेनिळे झाले आहे. यामुळे दोनवडे येथे अतिसाराचे रुग्ण आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने पाणी उकळून पाणी पिण्याच्या सूचना ग्रामस्थांना दिल्या आहेत. दूषित पाणी आले कुठून याची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर भोगावती नदीला गेले आठवडाभर पाण्याचा प्रवाह वाहता नसून पाणी साचून राहिले आहे. पाण्याचे प्रमाणही कमी आहे. यामुळे पाण्याला काळसर रंग आला आहे.
काही नागरिकांना पाणी पिल्यामुळे पोटात कळ करणे, उलटी व अतिसाराचे रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेताना दिसत आहेत. आठवड्यात आठ ते दहा पेशंटनी अतिसाराचे उपचार घेतले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.