हुल्लबाज तरुणांची पळता भुई थोडी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुल्लबाज तरुणांची 
पळता भुई थोडी...
हुल्लबाज तरुणांची पळता भुई थोडी...

हुल्लबाज तरुणांची पळता भुई थोडी...

sakal_logo
By

02915
कुडित्रे : येथील श्रीराम हायस्कूल येथे निर्भया पथक व पोलिसांनी एसटी थांबवून मुलींना सूचना केल्या. या वेळी जिल्हा अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, मेघा पाटील, मनीषा नारायणकर.

हुल्लडबाज तरुणांची
पळता भुई थोडी...
निर्भया भरारी पथकाकडून अचानक भेटी
कुडित्रे, ता. १९ : ‘निर्भया भरारी पथकाने वॉच ठेवण्याची गरज’ या मथळ्याखाली दैनिक ‘सकाळ’मधून प्रसिद्ध होताच, आज जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडित्रेसह कोल्हापूर शहरातील महाविद्यालय परिसरात अपर जिल्हा पोलिस अधीक्षक व निर्भयपथकाने अचानक भेटी दिल्या. या वेळी हुल्लडबाज तरुणांची पळता भुई थोडी झाली. विद्यार्थ्यांनी विना परवाना वाहन चालवू नये, गैर कृत्य करू नये, असे आवाहन अपर जिल्हा पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी या वेळी केले.
देसाई म्हणाल्या, ‘‘विना परवाना वाहन चालवू नये, जशा मुलांच्या चुका आहेत तशा मुलींच्याही चुका आहेत. यासाठी पालक व शिक्षकांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, मुलांनी व्हाट्सॲप, फेसबुक, मोबाईलचा वापर टाळावा. आजची तरुण पिढी ही देशाची शक्ती आहे. विद्यार्थ्यांनी करिअरकडे लक्ष द्यावे. निर्भया पोलिस निराक्षक मनीषा नारायणकर म्हणाल्या, ‘‘जिल्ह्यात दोन महिन्यांत २१९ हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करून एक लाख बत्तीस हजार रुपये दंड आकारण्यात आला. २९ शाळेत ६७०० विद्यार्थ्यांना समुपदेशन केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक मेगा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या वेळी शहर निर्भया पथक महिला पोलिस संगीता मेटे, ऋतुजा सावंत, कादंबरी शेवाळे, एस. आय. घोरपडे, प्राचार्य अजित कुलकर्णी, उपप्राचार्य सी. एन. वाळके, शिस्त विभागाचे ए. डी. पाटील उपस्थित होते.