सुधारित करवीर वार्तापत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुधारित करवीर वार्तापत्र
सुधारित करवीर वार्तापत्र

सुधारित करवीर वार्तापत्र

sakal_logo
By

करवीर
कुंडलिक पाटील


काँग्रेस- नरके गटातच सामना

कुडित्रे, ता. ७ ः करवीर विधानसभा मतदारसंघात संमिश्र आघाड्या तर उर्वरित गावात काँग्रेसविरुद्ध नरके गटात लढती आहेत. माघारीनंतर पी. एन. पाटील काँग्रेस गटाकडे दोन, सतेज पाटील काँग्रेस गटाकडे एक व स्थानिक आघाडीकडे एक ग्रामपंचायत गेली. भाजप, शेकाप व स्थानिक आघाडीनेही दंड थोपटले आहेत.
गावचे सत्ताकेंद्र ताब्यात घेण्यासाठी गावातील पक्षगट, स्थानिक आघाड्यांची जुळवाजुळव झाली. अनेक ठिकाणी गटात उभी फूट पडून इच्छुकांची मांदियाळी झाली आहे. करवीर विधानसभामध्ये काँग्रेसविरुद्ध नरके गटात तर दक्षिणमध्ये काँग्रेसविरुद्ध भाजप अशा लढती होत आहेत. काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील गटतटाच्या स्थानिक आघाड्या झाल्य काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी लढती होत आहेत.
आमदार पी. एन. पाटील कॉंग्रेसविरुद्ध चंद्रदीप नरके गट, आमदार सतेज पाटील यांच्‍याविरुद्ध खासदार धनंजय महाडिक गट अशीच निवडणूक होत असल्याचे चित्र आहे. मूळची शिवसेना कोणाला साथ देणार महत्त्वाचे आहे.