
आमदार सतेज पाटील
03007
सांगरूळः वर्धापनदिनी बोलताना आमदार पाटील. शेजारी खासदार मंडलिक, आमदार आसगावकर, य. ल. खाडे, डी. एन. कुलकर्णी.
सांगरूळ शिक्षण संस्था
शिक्षणाची गंगोत्री
आमदार पाटील; वर्धापन दिन कार्यक्रम
सांगरुळ, ता. १७ ः कोल्हापूरला आणि शिक्षणाला छत्रपती शाहू महाराजांचा वारसा आहे. तोच वारसा घेऊन
ग्रामीण भागात शिक्षण संस्था उभारण्याचे कार्य स्व. डी. डी. आसगावकर व सहकाऱ्यांनी केले. सांगरूळ शिक्षण संस्था ग्रामीण भागातील शिक्षणाची गंगोत्री आहे. आज लाखो विद्यार्थी स्वकर्तृत्वावर उभे राहिले, असे उद्गार आमदार सतेज पाटील यांनी काढले. सांगरूळ शिक्षण संस्थेच्या वर्धापनदिनी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार संजय मंडलिक होते.
पाटील म्हणाले, ‘२०३५ मध्ये शिक्षण क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होतील. यासाठी देशात ३३ लाख शिक्षक लागणार आहेत. नवनवीन क्षेत्र निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना आहे.’
खासदार संजय मंडलिक म्हणाले, ‘ग्रामीण, शहरी स्पर्धा राहिली नसून जगाची स्पर्धा बनली आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षक, विद्यार्थ्यांना सज्ज राहावे लागेल.’
प्रास्ताविकात सचिव आमदार जयंत आसगावकर म्हणाले, ‘१९६० मध्ये सांगरुळ शिक्षण संस्थेची शाळा सुरू झाली. १७ शाखा कार्यरत आहेत. आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र व विविध अभ्यासक्रम सुरू आहेत.’
संस्थाध्यक्ष य. ल. खाडे, गोकुळ अध्यक्ष विश्वास पाटील, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग अध्यक्ष के. जी. पाटील, उपाध्यक्ष डी. जी. किल्लेदार, संस्थेचे उपाध्यक्ष डी. एन. कुलकर्णी, के. ना. जाधव, सदाशिव खाडे, दादासो लाड, एस. डी. लाड, बाबा पाटील, कोजिमा पतसंस्था अध्यक्ष डी. एस. घुगरे, एम. पी. चौगले, शिवाजी लोंढे, के. के. पाटील, आर. डी. पाटील, गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे, आनंदा कासोटे, बी. आर. नाळे, डी. जी. खाडे, मदन पाटील यांच्यासह सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.