सांगरुळमध्ये गुरुवारी रोजगार मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगरुळमध्ये गुरुवारी रोजगार मेळावा
सांगरुळमध्ये गुरुवारी रोजगार मेळावा

सांगरुळमध्ये गुरुवारी रोजगार मेळावा

sakal_logo
By

सांगरुळमध्ये गुरुवारी रोजगार मेळावा
सांगरुळ; ता. ९ ः जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , कोल्हापूर , गुरुवर्य डी . डी . आसगावकर शैक्षणिक , सामाजिक व क्रीडा विकास ट्रस्ट कुडित्रे व आमदार प्रा. जयंत आसगावकर फौंडेशनतर्फे गुरुवारी (ता. १६ ) सांगरुळ हायस्कल, सांगरुळ येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रा. आसगावकर म्हणाले, ‘गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ३ वेळेत रोजगार मेळावा होईल. जिल्ह्यातील नामांकित खासगी कंपन्या येतील. खासगी अस्थापनातील १ हजारपेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी मार्गदर्शन होईल. दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर, डिप्लोमा, इंजिनिअर, बीएस्सी झालेल्या उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे निवड केली जाईल.उमेदवारांनी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र कोल्हापूर यांच्या पोर्टल व आमदार प्रा. जयंत आसगावकर फौंडेशनचे अध्यक्ष अनिल घराळ व सदस्य नवीनचंद्र सणगर यांच्याकडे नोंदणी करावी. यावेळी अण्णासाहेब पाटील महामंडळ, महात्मा जोतिराव फुले महामंडळासह आठ महामंडळे व बँकांचे स्टॉल असतील. अर्थसहाय्य देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’