कुंभीच्या अध्यक्षपदी चंद्रदीप नरके, उपाध्यक्षपदी विश्वास पाटील यांची बिनविरोध निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभीच्या अध्यक्षपदी चंद्रदीप नरके,  उपाध्यक्षपदी विश्वास पाटील यांची बिनविरोध निवड
कुंभीच्या अध्यक्षपदी चंद्रदीप नरके, उपाध्यक्षपदी विश्वास पाटील यांची बिनविरोध निवड

कुंभीच्या अध्यक्षपदी चंद्रदीप नरके, उपाध्यक्षपदी विश्वास पाटील यांची बिनविरोध निवड

sakal_logo
By

03282, 03283
....

कुंभी साखर कारखान्याच्या
अध्यक्षपदी चंद्रदीप नरके

उपाध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड

कुडित्रे ता.३ ः कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या नूतन अध्यक्षपदी माजी आमदार चंद्रदीप नरके व उपाध्यक्षपदी विश्वास पाटील-कोगेकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी काम पाहिले. निवडीनंतर ‘गोकुळ’चे संचालक अजित नरके यांनी भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.


निवडीनंतर अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी, चार पंचवार्षिक निवडणुकांमध्ये सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखविला. या विश्वासामुळेच आमचे संपूर्ण पॅनेल निवडून आले आहे. याबद्दल सभासद, कर्मचारी, तोडणी वाहतूकदार यांचे आभार मानले.

अध्यक्षपदासाठी चंद्रदीप नरके यांचे नाव संचालक अनिल पाटील यांनी सुचविले, तर पी. डी. पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी विश्वास पाटील यांचे नाव संचालक अनिष पाटील यांनी सुचविले. त्यास संजय पाटील यांनी अनुमोदन दिले.
यावेळी डॉ. बी. बी. पाटील, दादासो लाड यांनी मनोगत व्यक्त केले. विश्वास पाटील यांनी आभार मानले. यावेळी संचालक किशोर पाटील, उत्तम वरुटे, अनिल पाटील, विलास पाटील, राहुल खाडे, धनश्री पाटील, सर्व संचालक, कार्यकर्ते उपस्थित होते. निवडीनंतर उपाध्यक्ष पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
...