सदस्य अपात्र गायरान व सार्वजनिक जागेत अतिक्रमण केल्याचा ठपका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदस्य अपात्र  गायरान व सार्वजनिक जागेत अतिक्रमण केल्याचा ठपका
सदस्य अपात्र गायरान व सार्वजनिक जागेत अतिक्रमण केल्याचा ठपका

सदस्य अपात्र गायरान व सार्वजनिक जागेत अतिक्रमण केल्याचा ठपका

sakal_logo
By

नागदेववाडीतील दोन ग्रामपंचायत सदस्य अपात्र

गायरान जागेत अतिक्रमण केल्याचा ठपका

बालिंगा, ता. ८ः नागदेववाडी (ता. करवीर) येथील एक ग्रामपंचायत सदस्य व एका सदस्यांचे सासरे यांनी गायरान व सार्वजनिक मालमत्तेत अतिक्रमण केल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दोन सदस्यांना अपात्र घोषित केले आहे. उत्तम निवृत्ती निगडे व शिवानी पंकज दिवसे असे या विद्यमान सदस्यांची नावे आहेत. सदस्य अपात्र होणारी करवीर तालुक्यातील ही तिसरी घटना आहे.
येथील ग्रामपंचायत सदस्य शिवानी दिवसे व उत्तम निगडे हे २०२१ मध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आले होते. या दोन सदस्यांनी गायरान व शासनाच्या सार्वजनिक मालमत्तेत अतिक्रमण केले असल्याची तक्रार ग्रामस्थ सरदार केशव दिवसे व भीमराव शिवाजी भरणकर यांनी डिसेंबर २०२० मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाराखाली संबंधित जागेची मोजणी व पाहणी करण्यात आली होती. गेली दीड वर्षे यावर सुनावणी सुरू होती.

सदस्य शिवानी दिवसे यांच्या नातेवाईकांनी गायरान गट नंबर १४१ व गट नंबर ७२/२ व मिळकत नंबर ७ या सरकारी व सार्वजनिक मालमत्येवर अतिक्रमण करून पक्की दोन मजली इमारत बांधकाम केल्याची तक्रार ग्रामस्थ सरदार दिवसे यांनी केली होती . तर दुसरे सदस्य उत्तम निगडे यांनी सरकारी गायरान गट नं.१४१ मध्ये ग्रामपंचायत मिळकत क्रमांक ३९५ मध्ये बांधकाम करून जनावरांच्या गोठ्यासाठी वापर करत असल्याची तक्रार केली होती. या दोन्ही सदस्यांनी पुणे आयुक्तांच्या कडे जिल्हाधिकाऱ्यांच्या सदस्य अपात्र केल्याच्या निर्णयाच्या विरोधात दाद मागितली आहे.