अपघाती मृत्यू
03297, 03298
शंकर पाटील,
दुसऱ्या छायाचित्रात अपघाताच्या ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला टेम्पो व चालणारा शेतकरी
....
दोनवडे येथे शेतकऱ्याचा
टेम्पोच्या धडकेत मृत्यू
साबळेवाडी येथील शेतकरीः
कुडित्रे ता.१०ः कोल्हापूर - गगनबावडा मार्गावर दोनवडे ते वाकरे फाटा दरम्यान अज्ञात टेम्पोने चालत जाणाऱ्या शेतकऱ्याला मागून धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. शंकर हरी पाटील (वय ७०, रा.साबळेवाडी, ता.करवीर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. अपघातानंतर टेम्पो चालकाने पलायन केले. सीसीटीव्हीमध्ये हा छोटा टेम्पो कैद झाला आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.
साबळेवाडी येथील शंकर पाटील यांची वाकरे फाट्याच्या पूर्वेला असलेल्या पेट्रोल पंपाजवळ शेती आहे. आज सकाळी ते शेतातील विहिरीवरील विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले होते. कोल्हापूर - गगनबावडा मार्गे खुपीरे येथील शेताकडे ते पायी चालत निघाले होते. वाकरे फाट्याच्या पूर्वेला तीव्र चढावर त्यांना अज्ञात मालवाहक छोट्या टेम्पोने जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी रुग्णवाहिकेतून कोल्हापुरात शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.