मराठा बांधव न्याय व हक्कासाठी शाहू नगरीत दसरा चौकात  एकवटणार  : अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक

मराठा बांधव न्याय व हक्कासाठी शाहू नगरीत दसरा चौकात एकवटणार : अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक

दोनवडेः येथे पूर्वनियोजन बैठकीत बोलताना वसंतराव मुळीक. शेजारी इंद्रजित माने, उदय देसाई, दिलीप जाधव, रामचंद्र पवार.
03300
...

न्याय्य हक्कासाठी एकत्र या

वसंतराव मुळीक ः दोनवडेत मराठा समाजाची बैठक

कुडित्रे, ता. १२ ः अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने २३ मार्चला न्याय्य व हक्कासाठी शाहूनगरीत दसरा चौकात मराठा समाज एकवटणार असून, शेतकरी, महिला, विद्यार्थी व युवकांच्या भवितव्यासाठी मराठा समाजातील तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले. दोनवडे (ता. करवीर) येथे चैत्र पाडवा महामेळाव्यानिमित्त आयोजित पूर्वनियोजन बैठकीत ते बोलत होते.
मुळीक म्हणाले, ‘गेल्या पाच दिवसांत २६ बैठकांना जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. चैत्र पाडवा महामेळाव्याला मराठा बांधवांची उपस्थिती लाभावी यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू असून, गावोगावी बैठका, मान्यवरांना पत्र पाठविणे, प्रसिद्धीपत्रके, डिजिटल फलक, रिक्षावर बोर्ड, सोशल मीडिया याद्वारे प्रयत्न सुरू असून, मराठा समाजबांधवांनी मेळाव्याला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.’
मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक व ट्रॅक्टर कर्ज मिळावे, सारथी योजना व अण्णासाहेब पाटील महामंडळ या योजनेबाबत चर्चा होणार असल्याचे यावेळी जिल्हा संघटक उदय देसाई यांनी सांगितले.
दिलीप जाधव यांनी स्वागत केले. यावेळी शहर युवक अध्यक्ष इंद्रजित माने, जिल्हा युवक अध्यक्ष अवधूत पाटील, मनोज नरके, रामचंद्र पवार, राजाराम पाटील, अजित चौगले, रामदास पाटील आदी उपस्थित होते.
...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com