तरुणाचा बुडून मुत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणाचा बुडून मुत्यू
तरुणाचा बुडून मुत्यू

तरुणाचा बुडून मुत्यू

sakal_logo
By

03305
...

रंगपंचमी खेळून अंघोळीस गेलेल्या
कुडित्रेच्या तरुणाचा बुडून मुत्यू

कुडित्रे, ता.१३ ः कुंभी नदीपात्रात सांगरूळ बंधाऱ्याजवळ रंगपंचमी खेळून अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू झाला. विजय दामोदर पडवळ (वय ३५, रा. कुडित्रे) असे त्याचे नाव आहे. घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, विजय पडवळ रविवारी रंगपंचमी खेळून कुंभी नदीवरील सांगरूळ बंधाऱ्याजवळ अंघोळीसाठी गेला होता. बंधाऱ्यावर त्याचे कपडे व मोटारसायकल आढळून आली. दुपारी दोन वाजल्यापासून येथे त्याची मोटारसायकल, कपडे होती, पण तो कुठे आढळून येत नसल्याने नदीत बुडाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. नातेवाईक व ग्रामस्थांनी सायंकाळी पाचपासून शोध सुरू केला. पोलिसही दाखल झाल्याने घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतर अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली होती.
आज सकाळपासून जीवरक्षक उदय निंबाळकर व त्यांच्या पथकाने पुन्हा शोधमोहीम सुरू केली होती. तब्बल चार तासांनंतर विजयचा मृतदेह नदीत सापडला. विजय अल्पभूधारक शेतकरी असल्याने तो शेतमजूर म्हणून काम करत होता. त्याच्या मागे पत्नी, मुलगी व आई असा परिवार आहे.