पीएम किसान योजनेचा गोंधळ

पीएम किसान योजनेचा गोंधळ

पीएम किसान योजनेत सावळा गोंधळ
पाच महिने शेतकऱ्यांचे हेलपाटे; कृषी आयुक्तालयाचा तालुक्यांना यूजर आयडी देण्यास नकार


कुंडलिक पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. १५ ः राज्यभरात पीएम किसान तथा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा गेली पाच महिने सावळा गोंधळ उडाला आहे. कृषी आयुक्तालयाने तालुक्यांना यूजर आयडी देण्यास नकार दिल्यामुळे कृषी खात्यानेच या योजनेला ठेंगा दाखविला आहे. परिणामी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि कृषी खाते कार्यालयात हेलपाटे मारताना दिसतात.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १३ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कर्नाटकातील बेळगावमधून वितरित केला. यानंतर आता देशात योजनेतील सुमारे आठ कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट १३ व्या हप्त्याचे पैसे जमा केले जातील.
यात लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एकूण १६.८०० कोटी रुपये जारी केले आहेत. योजनेच्या १३ व्या हप्त्यांतर्गत आठ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना रब्बी हंगामपूर्वी त्यांच्या बँक खात्यात थेट २००० रुपये दिले जातील. याआधी १७ ऑक्टोबर २०२२ ला १२ वा हप्ता जारी केला होता. डी. बी. जी.च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जात आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सरकारी योजना आहे. ही योजना १ डिसेंबर २०१८ पासून सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ती सुरू केली. यात लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना किमान उत्पन्न समर्थन म्हणून प्रतिवर्ष ६००० रुपये दिले जातात. जमिनीचा आकार विचारात न घेता या योजनेत १२५ दशलक्ष शेतकऱ्यांना सामावून घेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
यापूर्वी महसूल खात्याकडून ही योजना पाहिली जात होती. नोव्हेंबरपासून राज्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून कृषी खात्याकडे ही योजना देण्याची ऑर्डर झाली. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी यासंबंधीचे परिपत्रक जारी करण्यात आले होते. मात्र, कृषी आयुक्तालयाने तालुका कृषी अधिकाऱ्यांना लॉगिन आयडी देण्यास नकार दर्शविल्याने गेली पाच महिने या योजनेचा गोंधळ उडाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी विभागाशी संपर्क साधला असता यूझर आयडी क्रिएट झाला नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे हप्ता अनुदान मिळवण्यासाठी व नवीन प्रस्ताव देण्यासाठी शेतकरी महा-ई-सेवा यानंतर तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत.
(पूर्वार्ध)

कोट
कृषी आयुक्तालयाकडून लॉगिन आयडी मिळालेला नाही. शेतकरी यांनी तालुका ऑफिसमध्ये रजिस्टरला नोंद द्यावी. वरून परवानगी आल्यानंतर कृषी खाते काम करेल.
- जालिंदर पांगारे, जिल्हा कृषी अधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com