अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी

sakal_logo
By

शेतीसाठी दिवसा
वीजपुरवठा करा
पी. एन. पाटील यांची मागणी

कुडित्रे, ता. १६ : राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रपाळीने पाणी दिल्यामुळे त्यांचे जीवित धोक्यात येत आहे, यामुळे शेतीला दिवसात पाणी द्यावे तसेच धामणी प्रकल्पाचे संथगतीने चाललेल्या कामाला गती द्यावी अशा विविध मागण्या आमदार पी. एन. पाटील यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात केल्या.
राज्यातील शेतकऱ्यांना एक वर्ष मोफत वीज द्यावी, अशी मागणी आम्ही केली होती, मात्र उपमुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केलेली नाही. शेतकऱ्यांना रात्रपाळीने पाणी दिल्यामुळे मोठा धोका निर्माण होतो. करवीर मतदारसंघात डोंगराळ व दुर्गम भागातील शेतकऱ्यांवर गवारेड्यांचे हल्ले होतात. त्यामुळे दरवर्षी किमान दोन ते तीन शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागतात.त्यांच्यासाठी दिली जाणारी पंधरा ते वीस लाख रुपयांची नुकसान भरपाई ही कमीच आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीला दिवसा पाणीपुरवठा करावा.
धामणी प्रकल्प २२ वर्षे रखडला आहे. मध्यंतरीच्या दहा वर्षात काम बंदच होते. आता प्रकल्पासाठी ३१७ कोटी निधी मंजूर आहे. परंतु काम संथ गतीने चालू आहे. पुनर्वसनाचे काम तातडीने पूर्ण करून या प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.
करवीर मतदार संघातील कळे पोलीस ठाण्यासाठी २०१९/२० मध्ये ३ कोटी ७२ लाख रुपये मंजूर केले होते मात्र हाच खर्च २०२०/२१ मध्ये साडेचार कोटी तर २०२२/२३ मध्ये ५ कोटी १५ लाखा रूपयांवर पोहोचलेला आहे. या पोलीस ठाण्याचे काम तातडीने पूर्ण करावे. करवीर पोलीस ठाणे कोल्हापूर शहराच्या मध्यभागी आहे. येथे येणाऱ्या लोकांची गैरसोय होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी पर्याय म्हणून पोलीस खात्याने शिंगणापूर व रिंगरोडलाही जागाही पाहिली आहे. पोलीस स्टेशनचे कामही तातडीने सुरू करावे, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली.
राज्यात जल जीवन योजना १५ वर्षे जमेला धरून केलेले आहे, मात्र ही योजना ३० वर्षे जमेला धरून करावी तसेच प्रतिमाणशी ५५ लिटर ऐवजी ७० लिटर पाणीपुरवठा करावा.अनेक ठिकाणी पाईपलाईन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाजूपट्टीतून जाते.तेथून पाईपलाईन टाकण्यासाठी बांधकाम विभागाला ११५० रूपये प्रति मीटर इतका दर द्यावा लागतो.त्यामुळे योजनेपेक्षाही जादा खर्च येतो.हा खर्च परवडत नाही.नळ पाणीपुरवठा योजना ही अत्यावश्यक बाब आहे.त्यामुळे विहीत मुदतीत पुर्ण करण्यासाठी रस्ता पुर्ववत करुन देण्याच्या अटीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने पाईप लाईन घालणेस मंजूरी द्यावी.अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.