कुंभी कुस्ती स्पर्धा, प्रवीण पाटीलची विजयी सलामी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभी कुस्ती स्पर्धा, प्रवीण पाटीलची विजयी सलामी
कुंभी कुस्ती स्पर्धा, प्रवीण पाटीलची विजयी सलामी

कुंभी कुस्ती स्पर्धा, प्रवीण पाटीलची विजयी सलामी

sakal_logo
By

लोगो - कुंभी मानधनधारक कुस्ती स्पर्धा
03318
कुडित्रे : ‘कुंभी’ मानधनधारक कुस्ती स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी अध्यक्ष चंद्रदीप नरके, उपाध्यक्ष विश्‍वास पाटील, कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, भगवान पाटील.


प्रवीण पाटीलची विजयी सलामी
कुडित्रे, ता. १८ : कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या मानधनधारक कुस्ती स्पर्धेत पहिल्या दिवशी खुल्या गटात प्रवीण पाटील चाफोडी या मल्लाने तेजस मिरजकर खुपिरे याला चितपट करून विजयी सलामी दिली. आखाडा पूजन व कुस्ती स्पर्धेत उद्‍घाटन माजी संचालक भगवान पाटील यांचे हस्ते झाले. अध्यक्ष चंद्रदीप नरके, उपाध्यक्ष विश्‍वास पाटील, कुंभी बँक अध्यक्ष अजित नरके यांच्या उपस्थितीत कुस्त्यांना सुरुवात झाली.
कुंभी कासारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी मानधनधारक कुस्ती स्पर्धा विविध १२ वजनी गटात घेण्यात येतात. यावर्षी ३१ वी मानधनधारक कुस्ती स्पर्धा आजपासून सुरू झाली. खुल्या गटात दुसऱ्या कुस्तीत पांडुरंग पाटील आमशी याने ६-० गुणाने सूरज पाटील, खुपिरे याच्यावर विजय मिळविला. सानिकेत राऊत, पडळ याने ७-० गुणाने सुदर्शन पाटील, पुनाळ याच्यावर विजय मिळवला. अटीतटीच्या झालेल्या लढतीत संकेत पाटील, कोगे याने सलग दहा गुणांची आघाडी घेऊन राजवर्धन पाटील यांच्यावर विजय मिळवला.
स्पर्धा कारखान्याच्या कुस्तीसम्राट युवराज पाटील कुस्ती संकुलासमोर उभारण्यात आलेल्या कुस्ती आखाड्यात तीन दिवस चालणार असून यात ४३१ मल्लांनी सहभाग घेतला आहे. या वेळी संचालक बाजीराव शेलार, बी. बी. पाटील, राहुल खाडे, संजय पाटील, सरदार पाटील, अनिष पाटील, प्रकाश पाटील, बळवंत पाटील, वसंत आळवेकर, राऊ पाटील, विलास पाटील, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, सेक्रेटरी प्रशांत पाटील, कामगार प्रतिनिधी नामदेव पाटील, दीपक चौगले, अतुल नाळे, संजय आडनाईक, सरदार पाटील उपस्थित होते.