सांगरुळ सर्वपक्षीय बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगरुळ सर्वपक्षीय बैठक
सांगरुळ सर्वपक्षीय बैठक

सांगरुळ सर्वपक्षीय बैठक

sakal_logo
By

बाजीराव खाडेना लोकसभेसाठी
काँग्रेसतर्फे उमेदवारी मागणार

सांगरुळ, ता. २३ ः कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून सांगरूळचे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांना काँग्रेस पक्षाची लोकसभेची उमेदवारी मिळावी अशी मागणी सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली. सांगरुळमध्ये महादेव मंदिरात बैठक झाली. अध्यक्षस्थानी नानासो कासोटे होते.
पंचायत समिती माजी सभापती सीमा चाबूक म्हणाल्या, ‘भागाच्या विकासासाठी खाडेंना लोकसभेची उमेदवारी मिळावी अशी मागणी केली.’ पोपट मंडगे यांनी, त्यांच्या पाठीशी ग्रामस्थ उभे राहतील अशी आशा व्यक्त केली.एम. बी. खाडे म्हणाले, उमेदवारीसाठी काँग्रेसचे आमदारांना भेटणार आहे. काँग्रेस चे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे
म्हणाले, ‘राजकीय वारसा असलेली खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक हेच निवडणुकीनिमित्ताने समोर येत आहेत. यामुळे कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळो अगर न मिळो आपण निवडणूक लढवू.’ यावेळी भगवान लोंढे, विलास सासणे, कैलास सुतार, सुनील कापडे यांचे मनोगत झाले. गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे, शिवाजी खाडे, डी.जी. खाडे, सतीश तोरस्कर, लहू सासणे, विष्णू खाडे,पंढरीनाथ खाडे, पदाधिकारी उपस्थित होते.