४४ शेतकऱ्यांच्या वारसांना ८७ लाख मंजूर

४४ शेतकऱ्यांच्या वारसांना ८७ लाख मंजूर

४४ शेतकरी वारसांना ८७ लाख
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा; १६६ जणांचे प्रस्ताव

कुंडलिक पाटील
कुडित्रे, ता. २४ ः शेतात काम करताना अपघातात अपंगत्व आलेल्या एक व अपघातात मृत्यू पावलेल्या जिल्ह्यातील ४३ शेतकऱ्यांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत ८७ लाख मंजूर झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक हातभार मिळाला आहे.
पावसाळा व शेतात काम करताना शेतकऱ्यांचा अनेक कारणांनी अपघात होतो. अशावेळी शासनाकडून शेतकरी कुटुंबास आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु केली आहे. योजनेंतर्गत २०२१-२२ साठी ७ एप्रिल २०२१ ते ६ एप्रिल २०२२ कालावधी पूर्ण झाला. पुढील काळात योजना बंद होती. शासनाने विशेष बाब म्हणून २८ नोव्हेंबर २०२२ रोजी ७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ खंडित कालावधीतील विमा दाव्यांना मंजुरी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.
या कालावधीत जिल्ह्यातील अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या वारसदारांनी खात्याकडे नोंद दिलेली आहे. त्यापैकी १६६ प्रस्ताव प्राप्त झाले असून ९३ परिपूर्ण प्रस्ताव कृषी आयुक्तालय पुणे येथे मंजुरीसाठी सादर केले होते. जिल्हयातील १०६ दाव्यांपैकी पहिल्या टप्प्यात अपघातात अपंगत्व आलेल्या एका शेतकऱ्यास एक लाख व मृत्यू पावलेल्या ४३ शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख याप्रमाणे ४४ शेतकऱ्यांना ८७ लाख मंजूर झाले.
संबधित ४४ शेतकऱ्यांच्या वारसाच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रलंबित ६२ दाव्यांना लवकरच मंजुरी मिळेल. अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांनी लाभ घ्यावा; असे आवाहन कृषी पर्यवेक्षक संजय सुतार यांनी केले.

---------------
कोट
२०२२-२३ मध्ये ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट कालावधीत शेतकऱ्यास अपघाताने अपंगत्व, मृत्यू झाला असेल तर विमा दावे प्रस्तावासाठी तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, कृषी सहायक ग्राम पातळीवरील कृषी पर्यवेक्षकांशी संपर्क करावा.
- जलिंदर पांगरे , जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com