कुडित्रे येथे उद्यापासून रंगणार राज्यस्तरीय ग्रामीण फुटबॉल स्पर्धा

कुडित्रे येथे उद्यापासून रंगणार राज्यस्तरीय ग्रामीण फुटबॉल स्पर्धा

कुडित्रे येथे उद्यापासून रंगणार
राज्यस्तरीय ग्रामीण फुटबॉल स्पर्धा
कुडित्रे, ता. २८ : ग्रामीण भागात फुटबॉलचे प्रस्थ वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर कुंभी कासारी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. डी. सी. नरके यांच्या स्मरणार्थ कुडित्रे येथील नरके विद्यानिकेतनच्या मैदानावर राज्यस्तरीय ग्रामीण फुटबॉल चषक स्पर्धा ३० मार्चपासून आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या संघांना रोख रक्कम व स्वदेशी नरके चषक देण्यात येणार आहे, अशी माहिती सांगरूळ फुटबॉल क्लबचे अध्यक्ष संभाजी नाळे यांनी दिली.
नाळे म्हणाले, ‘‘माजी आमदार चंद्रदीप नरके व ‘गोकुळ’चे संचालक अजित नरके यांच्या सहकार्यातून ग्रामीण भागातील फुटबॉल खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत खेळण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी ही राज्यस्तरीय ग्रामीण फुटबॉल स्पर्धा आयोजित केली आहे. सलग अकरा वर्षे या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे.
ही स्पर्धा कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन व स्वाकरने फ्री यांच्या मान्यतेने घेण्यात येत आहे. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक - २५ हजार, द्वितीय क्रमांक - १७ हजार, तृतीय क्रमांक - १२ हजार, तर चतुर्थ क्रमांक पटकावणाऱ्या संघाला सात हजार, अशी रोख रक्कमेची बक्षिसे व चषक देण्यात येणार आहे. या शिवाय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मॅन ऑफ दी मॅच, बेस्ट फॉरवर्ड, बेस्ट डिफेन्स, बेस्ट गोली यांना चषक, मेडल देण्यात येणार आहे. ही स्पर्धा ३० मार्च ते २ एप्रिल अशी चार दिवस चालणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com