
सांगरुळमध्ये मंगळवारी कुस्ती मैदान
सांगरुळमध्ये मंगळवारी कुस्ती मैदान
सांगरुळ, ता. १ : सांगरुळमध्ये (ता. करवीर) मंगळवारी (ता. ४) ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त यात्रा कमिटी व खाडे तालीम यांच्यातर्फे कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी दोन्ही मल्ल हर्षद सदगीर व बाला रफिक यांच्यात लढत होणार आहे. प्रथम क्रमांकची दुसरी कुस्ती गणेश जगताप व अक्षय शिंदे यांच्यात होणार आहे, अशी माहिती ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
यात्रेनिमित्त ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी व खाडे तालीम सांगरूळ यांच्यातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये मंगळवारी कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे. प्रथम क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर विरुद्ध बाला रफिक यांची झुंज होणार आहे, तर प्रथम क्रमांकासाठी होणाऱ्या दुसऱ्या लढतीत उपमहाराष्ट्र केसरी गणेश जगताप विरुद्ध अक्षय शिंदे यांच्यात लढत होणार आहे. यासह ९० कुस्त्या होणार आहेत. तसेच बुधवारी सायंकाळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच घोडा गाडी स्पर्धा श्वान पळवने अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. या वेळी कुंभी माजी उपाध्यक्ष निवास वातकर, बदाम खाडे, विष्णूपंत खाडे, सरदार खाडे, तानाजी खाडे, सुरेश चाबूक, सचिन नाळे, दत्तात्रय मोरबाळे, गजानन शिवदे, रामदास खाडे उपस्थित होते.