करवीर तालुक्यात चुरशीने मतदान

करवीर तालुक्यात चुरशीने मतदान

करवीर तालुक्यात चुरशीने मतदान

कुडित्रेः बाजार समिती निवडणुकीसाठी करवीर तालुक्यात चुरशीने मतदान झाले. संस्था गटातून मात्र मतदानाची टक्केवारी कमी असल्याचे पाहायला मिळाले. करवीर तालुक्यात हळदी, कुडित्रे, सांगरूळ, इस्पुर्ली, हसूर दुमाला, वडणगे येथे मतदान केंद्रावर सकाळपासून मतदानाला सुरवात झाली. आमदार पी. एन. पाटील यांनी हळदी येथे संस्था गटातून मतदान केले. कुडित्रे येथे ग्रामपंचायत गटातून २०६ पैकी १६५ मतदान एक वाजेपर्यंत झाले होते. येथे संस्था गटातून ३०३ पैकी २३८ मतदान दुपारपर्यंत झाले होते. सांगरूळमध्ये ग्रामपंचायत गटातून १६९ पैकी १५० मतदान दुपारी तीन वाजेपर्यंत झाले तर संस्था गटातून ४४९ पैकी ३७४ मतदान झाले होते.
...

कागलमध्ये संस्था गटात ९८.८ टक्के मतदान

कागल : बाजार समिती निवडणुकीसाठी येथील मतदान केंद्रावर मोठ्या चुरशीने मतदान झाले. येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्या मंदिरमधील तीन मतदान केंद्रांवर हे मतदान झाले. विकास सेवा संस्था गटाच्या मतदान केंद्र क्रमांक ९ मध्ये ३५१ पैकी ३४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या केंद्रावर ९८.८ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे सकाळी आठ वाजताच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी कागल शहरातील मतदान केंद्राला भेटी दिल्या.
....
भुदरगडमध्ये सेवा संस्थात गटात ९२.८८ टक्के

गारगोटी : भुदरगड तालुक्यात गारगोटी, दारवाड, कडगाव, तांबाळे या चार मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. सेवा संस्था गटासाठी सरासरी ९२.८८ टक्के तर ग्रामपंचायत गटासाठी ९३.६७ टक्के मतदान झाले. संस्था गटातून २४०४ पैकी २२३३ तर ग्रामपंचायत मतदान गटातून ८२२ पैकी ७७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. गारगोटी केंद्रावर माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई, जिल्हा बँकेचे संचालक रणजित पाटील यांनी सेवा संस्था गटातून मतदानाचा हक्क बजावला.

...
कसबा तारळेत शंभर टक्के मतदान

राशिवडे बुद्रुक : राधानगरी तालुक्यात दहा मतदान केंद्रांवर शांततेत ९२ टक्के मतदान झाले. एकूण ३३१७ मतदारांपैकी ३०४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. राधानगरी व शेळेवाडी येथे दोन, राशिवडे बुद्रुक व कसबा तारळे येथे प्रत्येकी तीन मतदान केंद्रांवर मतदान झाले. राधानगरीमधील केंद्रावर ७०३, राशिवडेत ७८३, शेळेवाडीत ६६१ व कसबा तारळेत ९१८ मतदान झाले. त्यापैकी तारळेत एका केंद्रावर शंभर टक्के मतदान झाले.

.....
बांबवडे केंद्रावर संस्था गटात ९३.९६ टक्के मतदान

बांबवडे ः येथील केंद्रावर विकास सेवा संस्था गटातील ५१४ मतांपैकी ५८३ (९३.९६ टक्के) व ग्रामपंचायत गटातील ३६७ मतांपैकी ३३५ (९१.२८ टक्के) मतदान झाले. या केंद्रात माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड, उमेदवार शंकर पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला.
...
पन्हाळा तालुक्यात मतदान शांततेत
आपटीः पन्हाळा तालुक्यातील माले, पोर्ले तर्फ ठाणे,पडळ,कोतोली, कळे १,कळे २, आणि बाजारभोगाव या सात केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती.तालुक्यात सरासरी ९० टक्के मतदान झाले. निवडणुकीसाठी पन्हाळा पूर्व भागातील २२ गावांतील २१ ग्रामपंचायतींच्या २२२ सदस्य व ४३ विविध कार्यकारी तथा सेवा सोसायटींच्या ५७२ समिती सदस्यांसाठी येथील २ मतदान केंद्रांवर अनुक्रमे ९६ टक्के व ९२ टक्के मतदान झाले.
...
गगनबावडा,तिसंगी केंद्रावर शांततेत मतदान

गगनबावडा : तालुक्यात तिसंगी व गगनबावडा या दोन ठिकाणी मतदान झाले. गगनबावडा केंद्रावर सेवा संस्थांच्या ३९६ मतदारांपैकी २९४ मतदारांनी तर ग्रामपंचायतच्या १२९ मतदारांपैकी १२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तिसंगी केंद्रावर सेवा संस्थांच्या ३६३ मतदारांपैकी ३११ तर ग्रामपंचायतच्या १११ मतदारांपैकी १०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
...
कळे मतदान केंद्रावर ९३.५६ टक्के मतदान

कळे: बाजार समितीसाठी ९३.५६ टक्के मतदान झाले. ७९२ पैकी ७४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सेवा संस्थेच्या ६१० पैकी ५६५ सदस्यांनी तर वीस ग्रामपंचायतींच्या १८२ पैकी १७६ सदस्यांनी मतदान केले. प्राथमिक शाळेच्या इमारतीत मतदान केंद्र होते. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, अजित नरके, ‘जनसुराज्य’चे भरत घाडगे यांनी मतदान केंद्रावर भेटी दिल्या.
...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com