महाराष्ट्र दिन १ मे विशेष

महाराष्ट्र दिन १ मे विशेष

महाराष्ट्र दिन विशेषः लोगो
...

फोटो
शेकरू, हरियल, जारुल, निळी भिरभिरी फोटो वापरावे
...

शेकरू, हरियाल, जारुल संवर्धनाचे आव्हान

महाराष्ट्राच्या मानचिन्हांचा वन वन्यजीव विभागाला विसर; पर्यावरणप्रेमींकडून संवर्धनाची मागणी

कुंडलिक पाटील : सकाळ वृत्तसेवा

कुडित्रे, ता. ३० : जंगलतोडीमुळे महाराष्ट्राचे मानचिन्ह असणारे शेकरू, हरियाल, जारुल फूल धोक्यात आले आहेत. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू, फुलपाखरातील निळी भिरभिरी तर आंब्याचे गावठी वाण टिकवण्याचे आव्हान बनले आहे. राज्याच्या वन, वन्यजीव विभागाला याचा विसर पडला आहे. वनविभागात यावर कोणतीही माहिती मिळू शकली नाही. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पर्यावरणप्रेमींकडून या मानचिन्हंच्या संवर्धनाची मागणी होत आहे.

देशात महाराष्ट्राची ओळख ज्यामुळे आहे, अशी मानचिन्हे धोक्याच्या वळणावर आहेत. जसा राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय पक्षी मोर, तसेच प्रत्येक राज्यात प्राणी, पक्षी, वनस्पती, फुलपाखरे, फळांच्या माध्यमातून मानचिन्हे आहेत. या मानचिन्हांमुळेच देशात प्रत्येक राज्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. दुर्मिळ, आकर्षक आणि महत्त्वाच्या अशा विषयांची मानचिन्ह म्हणून निवड होत असते. मात्र सध्या जारुल, निळीभिरभिरी ही दुर्मिळ झाली आहेत. सह्याद्रीच्या रांगात गावांचे विस्तारीकरण झाले, यामुळे अमाप वृक्षतोड झाली आहे.
कोल्हापूर-गगनबावडा महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणात वड, पिंपळ वृक्ष मोठ्या प्रमाणात तोडले गेले. त्या झाडांवर असणारा हरियाल पक्षी धोक्यात आला आहे. पश्चिम घाट, कात्यायनी, सांगरुळ डोंगर परिसरात सध्या हरियाल क्वचित दिसतो. जंगलातील मोठी खार म्हणजे शेकरू. जंगलातील उंच- उंच झाडे आणि आवश्यक खाद्य नष्ट होत चालल्याने तसेच वाढत्या मानवी वावरामुळे शेकरू दिसेनासा झाला आहे.
पाटगाव, पन्हाळा, चंदगड, आजरा, भुदरगड, आंबा या जंगल क्षेत्रात सध्या दुर्मिळ शेकरू नजरेत पडतो. आंबा, हिरडा, बेरडा ही झाडे खाद्याची ठिकाणे आहेत. शेकरू हा समृद्ध जंगलाचा निर्देशांक मानला जातो. काही वर्षांपूर्वी पर्यावरण मंत्रालयाने शेकरू संवर्धन पंधरवडा साजरा केला. मात्र शासनाला पुढे याचा विसर पडल्याचे दिसते. कोल्हापूर वनविभागशी संपर्क साधला असता शेकरूची गणना किंवा संवर्धन याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
महाराष्ट्रात आंबा हे महत्त्‍वाचे फळ आहे. राज्यात आंब्याच्या १६०० हून अधिक जाती आहेत. गावठी आंब्याची झाडे पूर्वी शेताच्या बांधावर दिसत होती. आता ती दुर्मिळ झाली आहेत. फुलपाखरांना आकर्षित करणारी राणलिंबूची झाडेही दुर्मिळ झाली आहेत.
...

‘मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावे. निसर्गात ज्या त्या परिस्थितीनुसार टिकणारे जुने आंब्याचे वाण दुर्मिळ होत आहेत. जंगल तोड झाल्याने आणि डोंगर पेटवल्यामुळे पशुपक्षी मरण पावत आहेत.

अनिल चौगले, निसर्गमित्र संस्था
...

चौकट

‘शेकरू मित्र’ नेमून गणना

अणुस्कुरा, राधानगरी, दाजीपूर, गोलिवडे, हसणे, पाटपन्हाळा या ठिकाणी शेकरूंचे प्रमाण अधिक आहे. स्थानिक गावांतून ‘शेकरू मित्र’ नेमून शेकरूंची गणना, मूल्यमापन सुरू होते. शेकरूंची संख्या वन विभागाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com