सांगरुळ मध्ये आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमांनी संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगरुळ मध्ये आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमांनी संपन्न
सांगरुळ मध्ये आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमांनी संपन्न

सांगरुळ मध्ये आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमांनी संपन्न

sakal_logo
By

भीमशक्ती तरुण मंडळातर्फे
सांगरुळमध्ये विविध कार्यक्रम

सांगरुळ, ता.७ ः येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमशक्ती तरुण मंडळ यांच्यावतीने गेल्या सात दिवसापासून विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. त्याची सांगता पारंपारिक वाद्याच्या गजरात भव्य मिरवणुकीने करण्यात आली.
सांगरुळ येथे भीमशक्ती तरुण मंडळ पंचशील नगर सांगरुळ यांच्यावतीने एक मे ते ७ मे दरम्यान आंबेडकर जयंती सप्ताहाचे आयोजन केले होते. यामध्ये सात दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी रक्तदान शिबिर, स्लो सायकल स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा असे विविध कार्यक्रम पार पडले, तर मिरवणुकीत भिमशक्ती लेझीम पथक, भीम मूर्ती स्क्रीन शो यासह होय मी जय भीमच बोलणार या पथनाट्यसह पारंपारिक वाद्याच्या गजरात उत्साहात मिरवणूक पार पडली.