अपघात,ओढ्यावर चिखल

अपघात,ओढ्यावर चिखल

बालिंगा ओढ्यावर चिखल,
दुचाकीस्वार घसरले


बालिंगा, ता.८- कोल्हापूर- गगनबावडा मार्गावर बालिंगा येथे रस्त्याचे काम सुरू असून पर्यायी मार्गावर चिखल झाल्याने रात्री साडेदहा वाजता वाहतुकीची कोंडी झाली. यावेळी काही दुचाकीस्वार घसरून अपघात झाले. एखादा मोठा अपघात होण्याआधी संबंधित खात्याने पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.
बालिंगा ओढा येथे मोरीचे काम सुरु आहे. याठिकाणी रस्त्यावर आज सकाळी दोन्ही बाजूला माती टाकली आहे. सायंकाळी झालेल्या पावसामुळे चिखल झाल्यामुळे दुचाकी वाहने घसरून काही अपघात झाले. यामुळे राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत होता.
कोल्हापूर- गगनबावडा रस्त्याचे रस्ता रुंदीकरण सुरू आहे. बालिंगेच्या पूर्वेला मोठ्या मोरीचे काम सुरू आहे. यामुळे रस्ता पर्यायी मार्गाने सुरू केला आहे. हा पर्यायी रस्ता मुरूम व मातीचा केला आहे. आज रात्री आठच्या सुमारास एक तास बालिंगा परिसरात पाऊस झाला. यावेळी या ओढ्यातील मातीचा रस्त्यावर चिखल झाला.यामध्ये दुचाकीस्वार घसरले. निसरट इतक्या मोठ्या प्रमाणात झाली की, मोपेडसारख्या लहान गाड्या या रस्त्यावरून नेता येईनात.काही दुचाकीस्वार पडले, त्यांना ग्रामस्थांनी व वाहनचालकांनी उठविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com